घरक्रीडाअखेर धोनीने बदलले ग्लोव्ह्ज

अखेर धोनीने बदलले ग्लोव्ह्ज

Subscribe

धोनीच्या ग्लोव्ह्ज संदर्भात मोठे वादंग उठले होते. या संदर्भात बीसीसीआयने देखील धोनीचे समर्थन केले होते. मात्र, धोनीला शेवटी ग्लोव्ह्ज बदलावे लागले आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या ग्लोव्ह्जवर मोठे वादंग उठले होते. धोनीच्या ग्लोव्ह्जवर पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटचे ‘बलिदान’ चिन्ह होते. या चिन्हावर बीसीसीआयने आक्षेप घेतला होता. आयसीसीने धोनीला ग्लोव्ह्जवरुन हे चिन्ह काढायला लावले होते. बीसीसीआयच्या या निर्णयावर मोठे वादंग उठले होते. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी आयसीसीच्या या आक्षेपावर टीका केली होती. याशिवाय भारतीय खेळाडूंनी देखील धोनीची बाजी घेतली होती. ग्लोव्ह्जवर बलिदान चिन्ह असणे हा सम्मानाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, आयसीसी आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे धोनीने अखेर आपले ग्लोव्ह्ज बदलले आहे.

ms dhoni

- Advertisement -

धोनीने का बदलले ग्लोव्ह्ज?

विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना बुधवारी खेळला गेला. या सामन्यात भारताने साऊथ आफ्रिकेचा पराभव करत विजयी सलामी दिली. मात्र भारताच्या विजयापेक्षा धोनीच्या हातातील ग्लोव्ह्जवर मोठी चर्चा झाली. कारण आयसीसीने धोनीच्या ग्लोव्ह्जवरील बलिदान चिन्हावर आक्षेप घेतला. यावर पाकिस्तानचे नेतेमंडळीही आपले अकलेचे तारे तोडायला लागले होते. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री फवाद हुसैन यांनी ‘धोनी तिथे महाभारतसाठी नाही तर क्रिकेट खेळायला गेला आहे’ असे वक्तव्य केले होते. दरम्यान, बीसीसीआयने आयसीसीजवळ धोनीच्या समर्थनार्थ बाजू मांडली. मात्र, आयसीसीने बीसीसीआयच्या मागणी फेटाळले. त्यामुळे धोनीने आपले ग्लोव्ह्ज बदलल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -