नवी दिल्ली: India vs AUS World Cup 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी झालेल्या विश्वचषकात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. संपूर्ण देशाला भारताच्या विजयाची अपेक्षा असतानाच पराभवानंतर संपूर्ण वातावरण बदलले. विराट कोहलीने या सामन्यात आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला, मात्र टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्यात अपयश आले. केएल राहुलने 66 धावा केल्या, तर विराट 54 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सामन्यानंतर अनुष्का शर्मासोबतचे त्याचे काही फोटो समोर आले आहेत. (World Cup 2023 IND Vs AUS Virat Kohli Dejected After India Defeat Anushka Sharma hugged her husband)
पराभवानंतर विराट-अनुष्का झाले निराश
भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 240 धावांचे छोटे लक्ष्य ठेवले होते, ज्यात प्रतिस्पर्धी संघाने सहज विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून विजय मिळवला, त्यानंतर भारतीयांना निराशेला सामोरे जावे लागले. त्याचवेळी, मॅचनंतर विराट कोहलीचे अनुष्कासोबतचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री तिच्या पतीला धीर देताना दिसत आहे. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर पराभवाचे दु:ख स्पष्ट दिसत होते.
अथियाचाही चेहरा पडला
अनुष्का शर्माप्रमाणेच अथिया शेट्टीही टीम इंडिया आणि पती केएल राहुलला सपोर्ट करण्यासाठी आली होती. पराभवानंतर तिचा चेहराही उतरला. दोन्ही अभिनेत्रींचा एक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन्ही अभिनेत्री पराभवानंतर दुःखी दिसत आहेत.
सामना पाहण्यासाठी अनेक स्टार्संची उपस्थिती
भारत आणि ऑस्ट्रेलिया विश्वचषक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, शाहरुख खान आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब हा सामना लाईव्ह पाहण्यासाठी आले होते.
वर्ल्ड कप फायनलपर्यंतचा भारताचा प्रवास कसा होता?
8 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला हरवून विश्वचषक 2023 च्या मोहिमेची सुरुवात केली. यानंतर संघाने लक्ष्याचा पाठलाग करत अफगाणिस्तान, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध विजयाची नोंद केली. संघ एका दिशेने धावतोय असे वाटत असताना भारताने जगाला दाखवून दिले की लक्ष्य कसे ठरवायचे आणि त्याचा बचाव कसा करायचा हे त्यांना माहीत आहे. त्यानंतर भारताने ग्रुप स्टेजचे सर्व 9 सामने इंग्लंडला 100 धावांनी, श्रीलंकेला 302 धावांनी, दक्षिण आफ्रिकेला 243 धावांनी आणि नेदरलँड्सला 160 धावांनी पराभूत केले.
उपांत्य फेरीत भारतासमोर न्यूझीलंडचे कडवे आव्हान होते, मात्र या सामन्यातही टीम इंडियाने किवी संघाला 397 धावांची मोठी धावसंख्या उभारून बॅकफूटवर आणले आणि हा सामना 70 धावांनी जिंकला. संपूर्ण विश्वचषकात भारताने चमकदार कामगिरी केली, पण अंतिम दिवस मात्र टीम इंडियाच्या नावावर नव्हता.
(हेही वाचा: ‘लेडीलक’ का कमाल; कमिन्सआधी धोनी आणि ‘या’ कर्णधारांसोबतही हेच घडलं )