Eco friendly bappa Competition
घर क्रीडा World Cup 2023 : अंतर्गत वादामुळे ICC ट्रॉफी जिंकण्यात भारतीय संघ अपयशी;...

World Cup 2023 : अंतर्गत वादामुळे ICC ट्रॉफी जिंकण्यात भारतीय संघ अपयशी; माजी खेळाडूचा दावा

Subscribe
World Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाला (Indian Cricket Team) मागील 13 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) एकही ट्रॉफी जिंकता आले नाही. भारतीय संघ आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीतपर्यंत मजल मारतो, पण ते स्पर्धा जिंकण्यात अपयशी ठरतात. त्यामुळे यंदा भारतात होणारा विश्वचषक कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकावा अशी क्रीडा चाहत्यांची अपेक्षा आहे. अशातच पाकिस्तानच्या (Pakistan) माजी विकेटकीपरने भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी का ठरतो, याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (World Cup 2023 Indian team fails to win ICC trophy due to internal dispute Ex-Players Claim)
पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक फलंदाज राशिद लतीफने म्हटले की, भारतीय संघात अंतर्गत वाद आहेत, त्यामुळे ते आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरत असल्याचा दावा त्याने केला आहे. राशिद लतीफने आपल्या यूट्यूब चॅनलवर विराट कोहलीविषयी आपली बाजू मांडताना म्हटले की, त्याने कर्णधारपद सोडल्यापासून भारतीय संघाचे मधल्या फळीतील फलंदाज सतत संघर्ष करताना दिसत आहेत. यामुळे भारतीय संघाची आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्याने निराशाजनक कामगिरी सुरू आहे.

कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्यात आले

विराट कोहलीच्या कर्णधारपदावर बोलताना लतीफ म्हणाला की, त्याला प्रत्येक सामना जिंकायचा होता, त्यामुळे तो त्या दिशेने काम करत होता. पण त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्यानंतर भारतीय संघाला अंतर्गत वादामुळे चांगली कामगिरी करता येत नाही. याशिवाय कर्णधार म्हणून विराट कोहलीनेही आयसीसी स्पर्धेत चांगली केली नाही. कारण त्याला संघात जे खेळाडू हवे होते, ते त्याला मिळाले नाहीत.

भारतीय संघाला चौथ्या क्रमांकावर चांगला फलंदाज हवा

राशिद लतीफ म्हणाला की, पुढील काही दिवसांत दोन मोठ्या स्पर्धा पार पडणार आहेत. श्रीलंकेत आशिया कप आणि भारतात विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संघात चांगले खेळाडू आहेत. हा संघ दोन्ही स्पर्धा जिंकून शकतो, पण त्याना नंबर 4 वर काम करावे लागणारे आहे. त्यांना चौथ्या क्रमांकावर एक चांगला फलंदाज हवा आहे, असे लतीफ म्हणाला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -