World Cup 2023 : 12 वर्षांनी भारतात आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 ला (ICC Cricket World Cup 2023) सुरूवात होणार आहे. या विश्वचषक स्पर्धेसाठी अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांनी श्रीलंकेतून भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आजपासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची उलटी गिनती सुरू झाली असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाहा यांनी बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना विश्वचषक स्पर्धेसाठी गोल्डन तिकिटाच्या रूपात एक खास भेट दिली. जय शाहा (Jay Shah) यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. (World Cup 2023 Jay Shaha gives golden ticket to Mahanayaka for World Cup What is special)
हेही वाचा – Virender Sehwag : विश्वचषकात खेळाडूंच्या जर्सीवर ‘हे’ नाव असावं; सेहवागच्या मागणीने वाद होणार?
जय शाहा यांनी ट्वीट करताना म्हटले की, आमच्या गोल्डन आयकॉन्ससाठी गोल्डन तिकिट. जय शाह, सचिव, बीसीसीआय यांना आज मिलेनियमचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना गोल्डन तिकिट सादर करण्याचा बहुमान मिळाला. एक दिग्गज अभिनेता आणि क्रिकेटचा कट्टर चाहता अमिताभ बच्चन यांचा भारतीय संघाला सततचा पाठिंबा आम्हा सर्वांना प्रेरणा देतो. 2023 च्या विश्वचषकासाठी त्यांना आमच्यासोबत सामील करून घेताना आम्ही उत्सुक आहोत. जय शाह यांनी अमिताभ बच्चन यांना गोल्डन तिकीट देताना छायाचित्रेही सोशल मीडियावर टाकली आहेत.
Golden ticket for our golden icons!
BCCI Honorary Secretary @JayShah had the privilege of presenting our golden ticket to none other than the “Superstar of the Millennium,” Shri @SrBachchan.
A legendary actor and a devoted cricket enthusiast, Shri Bachchan’s unwavering support… pic.twitter.com/CKqKTsQG2F
— BCCI (@BCCI) September 5, 2023
गोल्डन तिकीट का आहे खास?
गोल्डन तिकीट यासाठी खास आहे, कारण अमिताभ बच्चन यांना भारतातील कोणत्याही स्टेडियममध्ये सामना पाहता येणार आहे. बीसीसीआयने अमिताभ बच्चन गोल्डन तिकीट दिल्यामुळे त्यांना आता प्रमुख पाहुण्यांमध्ये स्थान मिळाले आहे.
हेही वाचा – ICC Cricket World Cup 2023 : भारतीय संघाची घोषणा; चार खेळाडू खेळणार पहिला विश्वचषक, वाचा कोण?
विश्वचषक 2023 साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.