घरक्रीडाworld cup 2023 : विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा; 15 महिन्यांनंतर गोलंदाजाचे पुनरागमन

world cup 2023 : विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा; 15 महिन्यांनंतर गोलंदाजाचे पुनरागमन

Subscribe

world cup 2023 : भारतात 5 ऑक्टोबरपासून होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी (world cup 2023) पाकिस्तान संघाची (Pakistan Team) आज (22 सप्टेंबर) घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील 15 सदस्यीय संघाची घोषणा करताना वेगवान गोलंदाज हसन अलीला (Hasan Ali) संघाता स्थान दिले आहे. तब्बल 15 महिन्यांनंतर हसन अली विश्वचषक स्पर्धेतून पुनरागमन करताना दिसणार आहे. (world cup 2023 Pakistan squad announced Hasan Ali comeback after 15 months Babar Azam)

विश्वचषक संघात खराब फॉर्ममध्ये असलेल्या फखर जमान आणि शादाब खान यांनाही संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आशिया कपमधील खराब कामगिरीनंतर शादाब खानला उपकर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते, अशा बातम्या येत होत्या. त्याला संघातून वगळलेही जाऊ शकते, अशीही चर्चा होती, पण तसे झालेले नाही. मात्र नसीम शाह दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याची अनुपस्थिती पाकिस्तान संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Shubman Gill पुढील विराट कोहली बनणार; विश्वचषकाआधी भारताच्या माजी खेळाडूचं मोठे विधान

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाने या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या उसामा मीरचा अतिरिक्त लेग स्पिनर म्हणून समावेश केला आहे. शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांच्यावर पाकिस्तानच्या वेगवान आक्रमणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, तर मोहम्मद हरीसला राखीव ठेवण्यात आले आहे. अष्टपैलू फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजने संघातील आपले स्थान कायम राखले असले तरी फहीम अश्रफला संघातून वगळण्यात आले आहे.

- Advertisement -

विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ उशीर जाहीर होण्याचे कारण?

आशिया चषकातील पाकिस्तानच्या संघाच्या खराब कामगिरीमुळे विश्वचषक संघाची घोषणा लांबणीवर पडली होती. आशिया चषकातील सुपर 4 सामन्यात आधी भारत आणि नंतर श्रीलंकेकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तान संघ स्पर्धेतून बाहेर पडला. याशिवाय आशिया चषक सुपर 4 मध्ये भारताविरुद्ध उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज नसीम शाहाच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यांच्या दुखापतीतून सावरण्याची पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रतीक्षा करत असल्यामुळे विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर व्हायला उशीरा झाला.

हेही वाचा – Nari Shakti Bill : स्थिर सरकार असल्याने नारी शक्ती वंदन कायदा वास्तवात उतरला – पंतप्रधान

एकदिवसीय विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ

फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, शादाब खान, उसामा मीर, मोहम्मद नवाज, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर , हसन अली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -