घरक्रीडाWorld Cup U19 : भारत नवव्यांदा अंतिम फेरीत? उपांत्य फेरीत आज द....

World Cup U19 : भारत नवव्यांदा अंतिम फेरीत? उपांत्य फेरीत आज द. आफ्रिकेशी लढत

Subscribe

भारताचा युवा क्रिकेट संघ 19 वर्षांखालील विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पोहोचला आहे. युवा खेळाडूंचा संघ अंतिम फेरीत जाण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी लढत देणार आहेत.

बेनोनी : भारतीय संघाला 2023च्या विश्वचषकावर आपले नाव कोरता आलेले नाही. पण भारतीयांचे हे स्वप्न आता युवा खेळाडू पूर्ण करण्याची शक्यता आहे. कारण भारताचा युवा क्रिकेट संघ 19 वर्षांखालील विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पोहोचला आहे. युवा खेळाडूंचा संघ अंतिम फेरीत जाण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाशी लढत देणार आहेत. दक्षिण आफ्रिकेसोबत आज (ता. 06 फेब्रुवारी) भारताचा सामना होणार आहे. आजच्या या सामन्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला तर नवव्यांदा भारतीय खेळाडू अंतिम फेरीत पोहोचतील. (World Cup U19: India’s youth players in the final for the ninth time)

हेही वाचा… Shubman Gill : “दुसऱ्या डावात इंजेक्शन घेऊन केली फलंदाजी”; शतकवीर शुभमन गिलकडून खुलासा

- Advertisement -

भारताच्या युवा संघाने सर्वाधिक पाच वेळा विश्वचषक आपल्या नावे केला आहे. त्यामुळे सहाव्यांदा देखील भारतच 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत विजयी होणार, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यंदाही भारताची बाजू भक्कम असून युवा खेळाडूंनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताने साखळी फेरीमध्ये तीन आणि सुपरसिक्समधील दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. ज्यामुळे उपांत्य फेरीतही भारताच्या युवा खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या संघावर विजय मिळवता येईल, असे मत व्यक्त करण्यात येत आहेत. या विश्वचषकात मुशीर खान व उदय सहारन या दोन फलंदाजांनी उत्तम खेळी केल्याने संघाची बाजू अधिक भक्कम झाली आहे. तर भारताच्या युवा गोलंदाजांनाही प्रभावी कामगिरी केल्याने संघाला आपली छाप पाडता आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, 19 वर्षांखालील क्रिकेटच्या सामन्यात भारताचा पाकिस्तानसोबत सामना झालेला नाही. परंतु, यावेळी मात्र हे दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर येण्याची शक्यता आहे. कारण भारताने उपांत्य फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास आणि पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचे आव्हान परतवून लावल्यास भारत-पाकिस्तानमध्ये अंतिम सामना होऊ शकतो. त्यामुळे किमान अंतिम फेरीत तरी हा सामना होईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताचा युवा संघ सहाव्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरेल, अशी इच्छा भारतीय क्रिकेट प्रेमींकडून व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -