घरक्रीडानियम आयसीसीचे, आमचे नाहीत!

नियम आयसीसीचे, आमचे नाहीत!

Subscribe

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नियमित आणि सुपर ओव्हरमध्ये बरोबरी असल्याने सर्वाधिक चौकार-षटकार मरणार्‍या संघाला विश्वविजेते घोषित करण्यात आले. इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा ९ चौकार-षटकार जास्त मारल्याने त्यांनी हा सामना जिंकला. सर्वाधिक चौकार-षटकार या निकषावर एखाद्या संघाला विश्वविजेतेपद देण्याच्या नियमामुळे आयसीसीवर बरीच टीका होत आहे. तसेच इंग्लंडने खर्‍या अर्थाने विश्वचषक जिंकलाच नाही असेही म्हटले जात आहे. मात्र, नियम आयसीसी बनवते, आम्ही नाही, असे अंतिम सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन म्हणाला.

न्यूझीलंडने हा सामना गमावणे दुर्दैवी आहे. मात्र, नियमांबाबत आम्ही काहीही करू शकत नाही. हे आयसीसीचे नियम आहेत. तुम्ही जर मला याव्यतिरिक्त काही पर्याय सुचवलात, तर मी काहीतरी बोलू शकेन. आयसीसीने हे नियम खूप आधीच बनवले आहेत. त्यामुळे याबाबत आता बोलणे योग्य होणार नाही, असे मॉर्गन म्हणाला.

- Advertisement -

न्यूझीलंडचा कर्णधार या नियमाबाबत म्हणाला, जेव्हा दोन संघ इतका चांगला खेळ करतात, तेव्हा कोणत्याही संघाला पराभव स्वीकारणे अवघड असते. मात्र, नियमांचा आम्ही आदर करतो. हे नियम खूप आधीच बनवले आहेत. हे नियम एखाद्या संघाला विश्वविजेता बनवतील असे कोणालाही वाटले नव्हते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -