Tennis : जगातील नंबर १च्या टेनिसपटूला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी शिकवला धडा

जगातील नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी चांगलाच धडा शिकवला आहे. नोव्हाकचा ऑस्ट्रेलियातील प्रवेश करण्याचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी त्याला गुरुवारी विमानतळावर थांबवून ठेवलं होतं. प्रवेशासंबंधीची कागदपत्रे सादर करू न शकल्याने त्याचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितलं की, जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. नियम म्हणजे नियम..,विशेषत: जेव्हा आमच्या धोरणांचा विचार केला जातो तेव्हा या धोरणांच्या वर कोणीही नाहीये, असं मॉरिसन म्हणाले.

व्हिसा रद्द केल्यामुळे वकिल कोर्टामध्ये आव्हान देणार

जोकोविच १७ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियामध्ये सुरू होणाऱ्या ओपन स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी मेलबर्न येथे पोहोचला होता. येथील काही स्थानिक माडियाने दिलेल्या माहितीनुसार, जोकोविचचे वकिल व्हिसा रद्द केल्यामुळे कोर्टामध्ये आव्हान देणार असल्याचा इशारा वकिलांकडून देण्यात आला आहे. जोकोविचला कोर्टातून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली पाहीजे, असं वकिलांचं म्हणणं आहे.

ऑस्ट्रेलियातील कोरोनाचे नियम कडक

ऑस्ट्रेलियातील कोरोनाचे नियम एकदम कडक आहेत. जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याची परवानगी मिळाल्यापासून आयोजकांवर टीका होत होती. कारण जोकोविचने कोरोना अहवाल शेअर केला नसतानाही त्याला स्पर्धेत खेळण्याची परवानगी देण्यात आली.

स्कॉट मॉरिसन यांनी व्यक्त केली नाराजी

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी काल (बुधवार) सांगितलं की, टेनिस सुपरस्टार नोव्हाक जोकोविचने कोविड-१९ लसीकरणात दिलेली सूट सिद्ध केली नाही. तर त्याला मायदेशी पाठवले जाईल, असं ते म्हणाले. ज्यांनी नियमांचे पालन केले नाही तरिसुद्धा जोकोविचला बोलावण्यात आले. त्यामुळे जाईल. ऑस्ट्रेलियन ओपनच्या आयोजकांवरही मॉरिसन संतापले होते.

मॉरिसन पुढे म्हणाले की, मला असं वाटतं की आस्ट्रेलियामध्ये प्रवेश करणाऱ्या इच्छुक व्यक्तीने आमच्या सीमेचं पालन केलं पाहीजे. नोव्हाक जोकोविच आता ऑस्ट्रेलियामध्ये येणार आहे. परंतु त्यांचं लसीकरण अद्यापही झालेलं नाहीये. वैद्यकीय कारणास्तव त्याला लसीकरण करता येत नाहीये, अशा प्रकारचा स्वीकारार्ह पुरावा त्याने देणं आवश्यक आहे. फक्त लसीकरण झालेले खेळाडूचं देशात प्रवेश करू शकतात.


हेही वाचा : Corona virus : इटलीहून अमृतसरमध्ये दाखल चार्टर्ड फ्लाईटमध्ये कोरोनाचा विस्फोट, १२५ प्रवासी पॉझिटिव्ह