Eco friendly bappa Competition
घर क्रीडा जगातील सर्वात श्रीमंत टी-20 लीग आयोजित करण्याबाबत सौदी अरेबियाचा 'IPL'ला प्रस्ताव?

जगातील सर्वात श्रीमंत टी-20 लीग आयोजित करण्याबाबत सौदी अरेबियाचा ‘IPL’ला प्रस्ताव?

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगमुळे (आयपीएल) जगभरातील खेळाडूंना आपला गेम दाखवण्याची संधी मिळाली आहे. भारतात 2008 साली सुरू झालेली ही आयपीएल आता जगभरात प्रसिद्ध झाली आहे.

इंडियन प्रीमियर लीगमुळे (आयपीएल) जगभरातील खेळाडूंना आपला गेम दाखवण्याची संधी मिळाली आहे. भारतात 2008 साली सुरू झालेली ही आयपीएल आता जगभरात प्रसिद्ध झाली आहे. अशातच सौदी अरेबियाने आयपीएलच्या मालकांना त्यांच्या देशात ‘जगातील सर्वात श्रीमंत T20 लीग’ आयोजित करण्याची ऑफर दिल्याची माहिती एका अहवालातून समोर येत आहे. (World Richest T20 League Saudi Arabia Proposes To IPL Owners IPL 2023)

आयपीएल 2023 ही जगभरातील सगळ्यात आकर्षक टी-20 बनली आहे. आर्थिक बाबतीत असो किंवा लीगमधील जागतिक दर्जाच्या खेळाडूंचा सहभाग असो किंवा सोशल मीडियावर असो, जगभरातील इतर T20 लीगच्या तुलनेत आयपीएलसमोर काहीच आव्हानात्मक राहिलेले नाही.

- Advertisement -

सध्या, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) भारतीय खेळाडूंना परदेशातील लीगमध्ये भाग घेण्यापासून प्रतिबंधित करते. तथापि, सौदी अरेबिया सरकारने नवीन टी-20 लीग स्थापन करण्याच्या प्रस्तावासह, भारतीय बोर्डावर आपली भूमिका बदलू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, हा विषय जवळपास एक वर्षापासून चर्चेत आहे. परंतु, काहीही ठोस होण्यापूर्वी या लीगला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) मान्यता घ्यावी लागेल. अलीकडेच आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी सौदी अरेबियाच्या क्रिकेटमधील स्वारस्याची पुष्टी केली.

‘आपण इतर खेळाकडे पाहिले तर अनेकजण त्यामध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे मला वाटते की क्रिकेट त्याच्यासाठी आकर्षक असेल. सौदी अरेबियाची खेळातील प्रगती लक्षात घेता क्रिकेट खूप चांगले काम करेल’, असे ग्रेग बार्कले यांनी सांगितले.

- Advertisement -

‘क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्यास खूप उत्सुक आहे. सौदी अरेबिया क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष प्रिन्स सौद बिन मिशाल अल-सौद यांच्या माहितीनुसार, आमचे उद्दिष्ट राज्यामध्ये राहणारे स्थानिक आणि परदेशी लोकांसाठी एक टिकाऊ उद्योग निर्माण करणे आणि सौदी अरेबियाला जागतिक क्रिकेटचे ठिकाण बनवणे हे आहे’, असेही ग्रेग बार्कले यांनी सांगितले.

अहवालानुसार, आयपीएल मालकांना आणि बीसीसीआयला त्यांच्या नियोजित टी-२० लीग आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात सौदी अरेबियात आशिया चषक स्पर्धा होऊ शकते. याशिवाय आयपीएलचे उद्घाटन सामने किंवा काही सामनेही तेथे होऊ शकतात.


हेही वाचा – शेवटच्या षटकापर्यंत सामना गेल्याने हार्दिक पंड्या नाराज; म्हणाला…

- Advertisment -