घरक्रीडाIPL 2023: चाहत्यांना धक्का? विराट, रोहितसह 'हा' खेळाडू IPL अर्ध्यावरच सोडणार?

IPL 2023: चाहत्यांना धक्का? विराट, रोहितसह ‘हा’ खेळाडू IPL अर्ध्यावरच सोडणार?

Subscribe

तीनुसार, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासारखे दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आयपीएल अर्ध्यावरच सोडू शकतात. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये इंग्लंडमधील केनिंगटन ओव्हल येथे 7 ते 11 जून दरम्यान, जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी शिवसुंदर दास यांच्या नेतृत्त्वाखाली निवड समिती लवकरच भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करणार आहे.

IPL चं यंदाचं पर्व आता चांगलचं रंगात येताना दिसत आहे. आयपीएलचा हा सोळावा हंगाम ऐन रंगात आला असतानाच क्रिकेटप्रेमींचा हिरमोड करणारी एक बातमी समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासारखे दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आयपीएल अर्ध्यावरच सोडू शकतात. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये इंग्लंडमधील केनिंगटन ओव्हल येथे 7 ते 11 जून दरम्यान, जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी शिवसुंदर दास यांच्या नेतृत्त्वाखाली निवड समिती लवकरच भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करणार आहे. ( World test championShip 2023 Rohit Sharma virat Kohli and Hardik Pandya will leave IPL 2023 )

7 ते 11 जून या काळात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये WTC चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडच्या केनिंगटन ओवलमध्ये हा सामना खेळवला जाईल. ज्यासाठी शिव सुंदर दास यांच्या नेतृत्त्वाखील निवड समिती लवकरच भारतीय संघाची घोषणा करेल. या सामन्यासाठी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असणारा राहुल द्रविड 23 किंवा 24 मे रोजी London च्या दिशेने निघेल. सोबतच भारतीय संघातील काही खेळाडूसुद्धा या सामन्यासाठी निघणार आहेत.

- Advertisement -

काही खेळाडू आयपीएलमधील जबाबदारी पूर्ण करुन लंडनच्या दिशेने निघतील, तर काही द्रविडसोबत. मुंबई आणि बंगळुरुचे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले नाहीत तर या खेळाडूंमध्य रोहित आणि विराट, आणि हार्दिक पांड्याच्या नावाचाही समावेश असणार आहे.

( हेही वाचा: Viral Video : अर्जुन तेंडुलकरने छोट्या मुलाला रडवलं, नेमकं असं काय घडलं? )

- Advertisement -

वर्ल्ड टेस्ट चॅम्पीयनशीपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघासमोर अनेक आव्हाने असतील. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरच्या दुखापतीने संघाचं टेन्शन वाढलं आहे. त्यामुळे अजिंक्य राहाणे पुन्हा संघात बोलावले जाऊ शकते.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पीयनशिपसाठी खेळाडूंची संभाव्य यादी

रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य राहाणे, केएल राहुल, सुर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, उमेश यादव.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -