World Test Championship : बुमराह टॉप, ऋषभ पंतने विराट,रोहितलाही टाकले मागे

World Test Championship Bumrah Top, Rishabh Pant left behind Virat, Rohit
World Test Championship : बुमराह टॉप, ऋषभ पंतने विराट,रोहितलाही टाकले मागे

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपम २०२१-२३ मध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा कायम राहिला आहे. भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह या चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. तर ऋषभ पंतने आपल्या फलंदाजीच्या जोरावर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मागे टाकत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. जसप्रीत बुमराहने श्रीलंकाविरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमधील पहिल्या डावात ५ विकेट घेतले आहेत. तर दुसऱ्या डावात त्याने एक विकेट घेतला आहे.

ऋषभ पंतने श्रीलंकाविरुद्धच्या पहिल्या डावात ३९ धावा केल्या तर दुसऱ्या डावात २८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ऋषभ पंत आता भारतीय खेळाडूंमध्ये सगळ्यात वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज ठरला आहे. डे-नाईटमध्ये सुद्धा त्याच्यावरुन वेगवान कोणी अर्धशतक केले नाही. ऋषभ पंत या दोन्ही डावांमध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या ५ फलंदाजांमध्ये जागा बनवण्यात यशस्वी झाला आहे.

पहिल्या ५ गोलंदाजांमध्ये बुमराहसोबत शमी

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या चरणात जसप्रीत बुमराह ९ सामन्यात ३८ विकेट घेत पहिल्या स्थानावर राहिला आहे. बुमराहने तीन वेळा ५ विकेट घेतले आणि या दरम्यान त्याचे प्रदर्शन चांगले राहिले आहे. २४ धावा देत ५ विकेट घेतले. जसप्रीत बुमराहसोबत टॉप ५ गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीचा समावेश आहे. शमीच्या नावावर ३० विकेटची नोंद आहे. इतर तीन खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडचा ओली रॉबिन्सन ३२ विकेट्ससह दुसऱ्या, पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी आणि दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा ३०-३० विकेट्ससह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहे.

टॉप ५ फलंदाजांमधून कोहली, रोहत बाहेर पंतची एंट्री

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करू शकले नाहीत, त्यामुळे ते आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या ५ खेळाडूंच्या यादीतून बाहेर पडले आहेत. त्याचबरोबर भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत ५१७ धावांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत केएल राहुल ५४१ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर जो रूट १००८ धावांसह अव्वल स्थानावर आहे आणि पाकिस्तानविरुद्ध कराची कसोटीत शतक झळकावणाऱ्या उस्मान ख्वाजानेही ५१२ धावांसह अव्वल ५ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.


हेही वाचा : Virat Kohli : माजी खेळाडू सुनील गावस्करचा विराटला खराब प्रदर्शन सुधारण्यासाठी सल्ला