Sunday, May 9, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा World Test Championship : भारत, न्यूझीलंडचे खेळाडू इंग्लंडला एकत्र प्रवास करणार?

World Test Championship : भारत, न्यूझीलंडचे खेळाडू इंग्लंडला एकत्र प्रवास करणार?

भारत आणि न्यूझीलंडमध्ये १८ ते २२ जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे.

Related Story

- Advertisement -

भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धा सुरु असून या स्पर्धेची ३० मे रोजी सांगता होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडसाठी रवाना होईल. भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये १८ ते २२ जून या कालावधीत जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना इंग्लंडमधील साऊथहॅम्पटन येथे होईल. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यावर खेळाडूंना क्वारंटाईन व्हावे लागणार असल्याने आयपीएलमध्ये खेळणारे न्यूझीलंडचे खेळाडू भारतीय खेळाडूंसोबतच इंग्लंडला प्रवास करण्याची शक्यता आहे. तसे संकेत न्यूझीलंडच्या खेळाडू युनियनचे अध्यक्ष हिथ मिल्स यांनी दिले आहेत.

बीसीसीआय आणि आयसीसीसोबत संपर्कात

आयपीएल स्पर्धा ३० मेपर्यंत चालणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या खेळाडूंना मायदेशी परत येऊन दोन आठवडे क्वारंटाईनमध्ये राहून त्यानंतर इंग्लंडला जाणे शक्य होणार नाही. न्यूझीलंडचे आयपीएलमध्ये सहभागी झालेले खेळाडू अंतिम सामन्यापर्यंत भारतातच थांबण्याची शक्यता आहे. जे खेळाडू कसोटी संघाचा भाग नाहीत, ते न्यूझीलंडला परत येऊ शकतील. परंतु, सध्याच्या परिस्थितीत फार प्रवास करणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही खेळाडू युनियन म्हणून न्यूझीलंड क्रिकेट, बीसीसीआय आणि आयसीसीसोबत सतत संपर्कात आहोत, असे मिल्स म्हणाले.

आयपीएलमध्ये न्यूझीलंडचे १० खेळाडू 

- Advertisement -

कर्णधार केन विल्यमसन (हैदराबाद), ट्रेंट बोल्ट (मुंबई), कायेल जेमिसन (बंगळुरू) आणि मिचेल सँटनर (चेन्नई) यांच्यासह न्यूझीलंडचे एकूण १० खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळत आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात २ जूनपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार असून या मालिकेसाठी न्यूझीलंडने २० सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्यानंतर खेळाडूंची संख्या कमी करून जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा होईल.

- Advertisement -