World Test Championship : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दक्षिण आफ्रिका पाचव्या क्रमांकावर, भारताचे स्थान धोक्यात

जोहान्सबर्गच्या वाँडरर्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या मैदानावर भारताला पहिल्यांदाच कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.

World Test Championship south africa on 5th number in point table india is on 2nd number
World Test Championship : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये दक्षिण आफ्रिका पाचव्या क्रमांकावर, भारताचे स्थान धोक्यात

दक्षिण आफ्रिकेने मालिकेत दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्याच दिवशी भारताला ७ गडी बाद करुन पराभूत केल आहे. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांमध्ये १-१ बरोबरी केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये गुण तालिकेत दक्षिण आफ्रिकेला चांगला फायदा मिळाला आहे. गुण तालिकेत ५ व्या स्थानी झेप घेतली आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारताने ९ कसोटी सामने खेळले आहेत. यातील ४ सामने जिंकले असून २ सामने गमावले आहेत. भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर कायम राहिला आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २ सामने खेळले आहे. दक्षिण आफ्रिकेचे आता १२ गुण झाले असून त्यांच्या खात्यात १ विजय आणि १ पराभव आहे. मात्र भारताची नववर्षाची सुरुवात चांगली राहिली नाही. कारण वाँडरर्समध्ये खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटी समान्यात दक्षिण आफ्रिकेने पराभूत केलं आहे.

गुणतालिकेत अव्वल स्थानी ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. ऍशेस मालिकेतील पहिले तीन कसोटी सामने ऑस्ट्रेलियाच्या संघाने जिंकले आहेत. त्यांचे एकूण ३६ गुण आहेत. त्याचबरोबर श्रीलंकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर २४ गुणांसह आहे. तर भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान ३६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु विजयाची टक्केवारी ७५ वर आहे. पाकिस्तान ४ सामने खेळले असून ३ जिंकले आणि १ पराभूत झाला आहे. न्यूझीलंडचा पराभव करणारी बांगलादेश ३३.३३ च्या विजयाच्या टक्केवारीसह सहाव्या क्रमांकावर आहे.

जोहान्सबर्गच्या वाँडरर्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या मैदानावर भारताला पहिल्यांदाच कसोटी सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारताचा पहिला डाव २०२ धावांत आटोपला होता. त्यानंतर भारताला केवळ २२९ धावा करता आल्या. यानंतर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात भारताला २६६ धावांत रोखून विजयासाठी २४० धावांचे लक्ष्य दिले. दक्षिण आफ्रिकेने ३ विकेट्स गमावून विजयाचे लक्ष्य गाठले आहे.


हेही वाचा : दक्षिण आफ्रिकेचा भारतावर दणदणीत विजय, मालिकेत १-१ अशी बरोबरी