घरक्रीडालाजिरवाण्या पराभवनानंतरही भारत अव्वल स्थानी कायम!

लाजिरवाण्या पराभवनानंतरही भारत अव्वल स्थानी कायम!

Subscribe

जागतिक कसोटी क्रमवारी

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला २-० असा व्हाईटवॉश दिला. परंतु, यानंतरही भारताला जागतिक कसोटी क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम राखण्यात यश आले. तसेच फलंदाजांच्या यादीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने दुसर्‍या स्थानी कायम आहे.

आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिले सात सामने जिंकणार्‍या भारताच्या खात्यात संध्या ११६ गुण असून त्यांनी जागतिक क्रमवारीतील संघांच्या यादीत आपले अव्वल स्थान राखले. तर न्यूझीलंड संघ ११० गुणांसह दुसर्‍या स्थानी असून तिसर्‍या स्थानावरील ऑस्ट्रेलियाच्या खात्यात १०८ गुण आहेत. न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांत केवळ ३८ धावा करणारा कोहली फलंदाजांमध्ये दुसर्‍या स्थानी कायम आहे.

- Advertisement -

मात्र, त्याच्यात (८८६) आणि अव्वल स्थानावरील स्टिव्ह स्मिथमध्ये (९११) आता २५ गुणांचे अंतर आहे. भारताच्या चेतेश्वर पुजाराला न्यूझीलंडविरुद्ध २५ च्या सरासरीने केवळ १०० धावाच करता आल्या. परंतु, क्रमवारीत त्याला दोन स्थानांची बढती मिळाली असून तो ७६६ गुणांसह सातव्या स्थानी पोहोचला आहे.

जेमिसनला तब्बल ३७ स्थानांची बढती!
जागतिक कसोटी क्रमवारीतील गोलंदाजांच्या यादीत भारताविरुद्ध १४ विकेट घेत मालिकावीराचा पुरस्कार मिळवणारा न्यूझीलंडचा टीम साऊथी चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचा सहकारी ट्रेंट बोल्ट आणि भारताचा जसप्रीत बुमराह गोलंदाजांत अनुक्रमे नवव्या आणि सातव्या स्थानी होते. न्यूझीलंडचा उंचपुरा वेगवान गोलंदाज कायेल जेमिसनला तब्बल ३७ स्थानांची बढती मिळाली. त्यामुळे ८० व्या स्थानावरुन तो थेट ४३ व्या स्थानी पोहोचला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -