घरक्रीडावरळी स्पोर्ट्स क्लब कबड्डी स्पर्धा

वरळी स्पोर्ट्स क्लब कबड्डी स्पर्धा

Subscribe

वेस्ली स्पोर्ट्स क्लबने अंतिम सामन्यात प्रेरणा मंडळाचा ४३-२३ असा पराभव करत वरळी स्पोर्ट्स क्लब आयोजित तृतीय श्रेणी कबड्डी स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. वेस्लीच्याच अरविंद कुमारने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळविला. प्रेरणाचा रोहित गुरव स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाईपटू तर वेस्लीचा प्रेमकुमार सर्वोत्कृष्ट पकडवीर ठरला.

वेस्ली आणि प्रेरणा या दोन संघांमधील अंतिम सामन्यात वेस्लीने अरविंद कुमारच्या चांगल्या चढायांमुळे पाहिल्या डावात भक्कम आघाडी मिळवली. अरविंदने दुसर्‍या डावातही आपला चांगला खेळ सुरू ठेवल्याने प्रेरणाला या सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळालीच नाही. त्यामुळे एकतर्फी झालेला हा अंतिम सामना वेस्लीने ४३-२३ असा २० गुणांच्या फरकाने जिंकला.

- Advertisement -

त्याआधी प्रेरणा आणि आकांक्षा या संघांमध्ये झालेला उपांत्य फेरीतील पहिला सामना अतिशय चुरशीचा झाला. रोहित गुरव आणि रोहित रसाळ यांनी वेगवान खेळ करीत प्रेरणाला मध्यंतराला १५-६ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, मध्यंतरानंतर अखिल गावडे आणि सुरज पाटील यांनी यशस्वी चढाया करत आकांक्षाला आघाडीवर नेले, पण शेवटच्या क्षणी खेळ ३०-३० असा बरोबरीत सुटला. अखेर पाच-पाच चढायांचा डाव प्रेरणा संघाने ६-५ असा जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीतील दुसर्‍या सामन्यात वेस्लीने काळेवाडीच्या विघ्नहर्ता संघाचा ४१-२३ असा फडशा पाडला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -