घरक्रीडावर्ल्डकप जिंकायला नक्कीच आवडला असता!

वर्ल्डकप जिंकायला नक्कीच आवडला असता!

Subscribe

अर्जेंटिना आणि बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी फुटबॉल इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर बार्सिलोनाने मागील दशकात अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. तो संघात असताना बार्सिलोनाने चार वेळा युएफा चॅम्पियन्स लीग, दहा वेळा ला लिगा, सहा वेळा कोपा डेल रे या स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.

मात्र, त्याला अर्जेंटिनाकडून खेळताना फारसे यश मिळालेले नाही. त्याला विश्वचषक जिंकण्यातही अपयश आले आहे. मला एकदातरी विश्वचषक जिंकायला नक्कीच आवडला असता, असे मेस्सी म्हणाला.

- Advertisement -

मला विश्वविजेता व्हायला नक्कीच आवडले असते. मात्र, याव्यतिरिक्त माझ्या कारकिर्दीतील एकही गोष्ट मी बदलणार नाही. मला जितके यश मिळाले तितके मिळाले. मला कसलीही तक्रार करायची नाही. माझ्या कारकिर्दीत इतका यशस्वी होईन आणि मला इतके चांगले अनुभव मिळतील याचा मी विचारही केला नव्हता, असे मेस्सीने सांगितले.

मेस्सीला २०१४ विश्वचषकात सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. मात्र, त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मारिओ गोट्झेने केलेल्या गोलमुळे जर्मनीने अर्जेंटिनाचा १-० असा पराभव केला. आता पुढील विश्वचषक २०२२ साली होणार असून मेस्सी तोपर्यंत ३५ वर्षांचा होईल. त्यामुळे तो विश्वचषकात खेळण्याची शक्यता कमीच आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -