घरक्रीडाWPL 2024: महाराष्ट्राच्या किरण नवगिरेची झंझावाती खेळी; अवघ्या 10 चेंडूंत ठोकल्या 48...

WPL 2024: महाराष्ट्राच्या किरण नवगिरेची झंझावाती खेळी; अवघ्या 10 चेंडूंत ठोकल्या 48 धावा

Subscribe

नवी मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या महिला प्रीमियर लीगच्या सहाव्या सामन्यात यूपी वॉरियर्सने 7 गडी राखून मोठा विजय मिळवला. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना यूपीसमोर 162 धावांचे लक्ष्य ठेवले होते. (WPL 2024 Maharashtra s Kiran Navgire innings 48 runs scored in just 10 balls)

किरण नवगिरेच्या (31 चेंडू, 57 धावा) झंझावाती फलंदाजीमुळे यूपीने अवघ्या 16.3 षटकांत 3 गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठले. किरण नवगिरेने वादळी खेळी केली. मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. या स्पर्धेतील वैयक्तिक पहिलं अर्धशतक ठोकलं. तसंच लेडी धोनी हे नाव सार्थकी लावलं आहे.

- Advertisement -

किरण निवगिरेने 31 चेंडूत 57 धावांची खेळी केली. यात 6 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता. कर्णधार एलिसा हिली हिच्यासोबत तिने पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. किरण नवगिरेने 57 धावांपैकी 48 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. म्हणजेच 10 चेंडूत 48 धावा ठोकल्या. यात चौकार आणि षटकारांचाही समावेश आहे.

सामना संपल्यानंतर सहकारी ग्रेस हॅरिसने किरणच्या फलंदाजीबाबत मोठे वक्तव्य केले. किरण धोनीप्रमाणे सेलिब्रेट करेल असे आम्हाला माहीत होते, असे हॅरिसचे म्हणणे आहे.

- Advertisement -

मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील सामना संपल्यानंतर, ग्रेस हॅरिस म्हणाली की, या विजयाचे श्रेय आमच्या कोचिंग स्टाफ आणि संघाच्या खेळाडूंना जाते. आम्ही आमची योजना मैदानावर राबवण्याचा आणि कमकुवतपणा सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. आमची टीम खूपच तरुण आहे, त्यामुळे बरेच लोक त्यांची कौशल्ये सुधारण्यात व्यस्त आहेत. त्यांना शिकण्यासाठी ही चांगली संधी आहे.

किरणला हिट पाहून खूप छान वाटलं. गेल्या मोसमात, जेव्हा तिने अर्धशतक झळकावले तेव्हा त्याने एमएस धोनीसारखे सेलिब्रेशन केले होते, त्यामुळे आज रात्री जेव्हा तिने अर्धशतक केले तेव्हा मला तिच्याकडून त्याच सेलिब्रेशनची अपेक्षा होती.

तसेच, या सामन्यातील किरणच्या फलंदाजीबद्दल माहिती दिली तर तिने 31 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 57 धावांची शानदार खेळी केली. त्यामुळे तिने मुंबईविरुद्धचे अर्धशतक अवघ्या 25 चेंडूत पूर्ण केले, जे WPL मध्ये मुंबईविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आहे.

(हेही वाचा: Serial Bomb Blast: 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी निर्दोष! अजमेर कोर्टाचा निकाल)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -