घरक्रीडाWPL Auction 2024 : भारताच्या दोन तर ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूवर धनवर्षा; मूळ...

WPL Auction 2024 : भारताच्या दोन तर ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूवर धनवर्षा; मूळ किमतीपेक्षा 20 पटीने जास्त बोली

Subscribe

मुंबई : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या आगामी हंगामासाठी आज (9 डिसेंबर) मिनी लिलावाचे (WPL Auction 2024) आयोजन करण्यात आले होते. मुंबईत झालेल्या या लिलावात सुमारे 165 खेळाडूंसाठी बोली लावण्यात आली होती, ज्यामध्ये 104 भारतीय खेळाडूंचा समावेश होता. विशेष म्हणजे काशवी गौतम, वृंदा दिनेशला आणि ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँडवर महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रात मूळ किमतीपेक्षा 20 पटीने जास्त बोली लागली. (WPL Auction 2024 Two Indian players one Australian player to win big Bid 20 times the original price Kashvi Gautam Vrinda Dinesh Annabelle Sutherland)

काशवी गौतम आणि अॅनाबेल सदरलँड या दोघी महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रात सर्वात महागड्या खेळाडू ठरल्या. काशवी गौतम मूळ किंमत 10 लाख होती आणि अॅनाबेल सदरलँड मूळ किंमत 40 होती. या दोघींसाठी गुजरात संघाने प्रत्येकी 2 कोटी मोजले तर, मूळ किंमत 10 लाख असलेल्या वृंदा दिनेशला यूपी वॉरियर्सने 1.3 कोटी रुपयांना विकत घेतला.

- Advertisement -

हेही वाचा – Kevin Pietersen : “मी IPL लिलावात उतरलो तर कसं राहिल?” इंग्लंडच्या माजी खेळाडूची इच्छा व्यक्त…

मुंबईत झालेल्या या लिलावात सुमारे 165 खेळाडूंसाठी बोली लावण्यात आली होती, मात्र केवळ 30 खेळाडू विकले गेले, त्यापैकी 9 विदेशी खेळाडू आहेत. या मिनी लिलावात, गुजरात जायंट्स (GG) ने सर्वाधिक 10 खेळाडू विकत घेतले, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) 7, यूपी वॉरियर्स (UPW) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांनी प्रत्येकी 5 आणि दिल्ली कॅपिटल्सने तीन खेळाडूंना विकत घेतले.

- Advertisement -

‘या’ 30 खेळाडूंवर यशस्वी बोली

1. काशवी गौतम – गुजरात जायंट्स, 2 कोटी (भारत)
2. अॅनाबेल सदरलँड – दिल्ली कॅपिटल्स, 2 कोटी (ऑस्ट्रेलिया)
3. वृंदा दिनेश – यूपी वॉरियर्स, 1.30 कोटी (भारत)
4. शबनम इस्माईल – मुंबई इंडियन्स, 1.20 कोटी (दक्षिण आफ्रिका)
5. फोबी लिचफिल्ड – गुजरात जायंट्स, 1 कोटी (ऑस्ट्रेलिया)
6. एकता बिष्ट – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 60 लाख (भारत)
7. जॉर्जिया वेअरहम – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 40 लाख (ऑस्ट्रेलिया)
8. डॅनियल वेट – यूपी वॉरियर्स, 30 लाख (इंग्लंड)
9. मेघना सिंग – गुजरात जायंट्स, 30 लाख रुपये (भारत)
10. केट क्रॉस – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 30 लाख रुपये (इंग्लंड)
11. एस. मेघना – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 30 लाख (भारत)
12. लॉरेन चीटल – गुजरात जायंट्स, 30 लाख रुपये (ऑस्ट्रेलिया)
13. सिमरन बहादूर – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 30 लाख रुपये (भारत)
14. वेद कृष्णमूर्ती – गुजरात जायंट्स, 30 लाख रुपये (भारत)
15. गौहर सुलताना – यूपी वॉरियर्स, 30 लाख (भारत)
16. सोफी मोलिनक्स – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 30 लाख रुपये (ऑस्ट्रेलिया)
17. प्रिया मिश्रा – गुजरात जायंट्स, 20 लाख (भारत)
18. एस. सजना – मुंबई इंडियन्स, 15 लाख (भारत)
19. त्रिशा पूजिता – गुजरात जायंट्स, 10 लाख (भारत)
20. अपर्णा मंडळ – दिल्ली कॅपिटल्स, 10 लाख (भारत)
21. पूनम खेमनार यूपी वॉरियर्स, 10 लाख (भारत)
22. अमनदीप कौर मुंबई इंडियन्स, 10 लाख (भारत)
23. सायमा ठाकोर यूपी वॉरियर्स, 10 लाख (भारत)
24. कॅथरीन ब्राइस – गुजरात जायंट्स, 10 लाख (स्कॉटलंड)
25. मन्नत कश्यप – गुजरात जायंट्स, 10 लाख (भारत)
26. अश्वनी कुमारी – दिल्ली कॅपिटल्स, 10 लाख (भारत)
27. फातिमा जाफर – मुंबई इंडियन्स, 10 लाख (भारत)
28. कीर्तन बालकृष्णन – मुंबई इंडियन्स, 10 लाख (भारत)
29. शुभा सतीश – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 10 लाख (भारत)
30. तरन्नुम पठाण – गुजरात जायंट्स, 10 लाख (भारत)

हेही वाचा – चिंताजनक: AI च्या माध्यमातून महिलांच्या फोटोंना दिलं जातंय वेगळंच रूप; ‘त्या’ वेबसाइटचे 2.4 कोटी वापरकर्ते 

‘या’ स्टार खेळाडूंवर बोली नाही

वेस्ट इंडिजची अष्टपैलू डिआंड्रा डॉटिन आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज किम गर्थ यांनी त्यांची मूळ किंमत सर्वाधिक 50 लाख रुपये ठेवली होती. परंतु या दोन्ही खेळाडू अनसोल्ड राहिल्या. यानंतर इंग्लंडची यष्टिरक्षक एमी जोन्सची मूळ किंमत 40 लाख रुपये होती आणि श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टू हिची मूळ किंमत 30 लाख होती. या दोघींनाही खरेदीदार मिळाला नाही.

लिलावासाठी फ्रेंचायझी संघांच्या पर्समध्ये किती रुपये

दरम्यान, महिला प्रीमियर लीगच्या लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या पाचही संघांनी एकूण 60 खेळाडूंना कायम ठेवले होते, ज्यात 21 परदेशी खेळाडूंचा समावेश होता. लिलावासाठी फ्रेंचायझी संघांच्या पर्समध्ये एकूण 17.65 कोटी रुपये उपलब्ध होते. गुजरात जायंट्सकडे सर्वाधिक 5.95 कोटी रुपये होते, तर गतविजेत्या मुंबई इंडियन्सकडे 2.10 कोटी रुपये होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -