भारताच्या ‘या’ कुस्तीपटूने पराभवाच्या रागात पंचांना केली मारहाण

भारतीय कुस्तीपटू सतेंदर मलिक याने पराभवाच्या रागात पंचानाच मारहाण केल्याची घटना घडली आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी नवी दिल्लीत कुस्तीपटूंच्या चाचण्या केल्या जात आहेत. भारतीय कुस्ती महासंघ (WFI) तर्फे केडी जाधव स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये मंगळवारी अनेक कुस्तीपटूंची चाचणी घेण्यात आली.

भारतीय कुस्तीपटू सतेंदर मलिक याने पराभवाच्या रागात पंचानाच मारहाण केल्याची घटना घडली आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 साठी नवी दिल्लीत कुस्तीपटूंच्या चाचण्या केल्या जात आहेत. भारतीय कुस्ती महासंघ (WFI) तर्फे केडी जाधव स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये मंगळवारी अनेक कुस्तीपटूंची चाचणी घेण्यात आली. मात्र, कुस्तीपटूंची चाचणी सुरू असताना 125 किलो वजनी गटातील कुस्तीपटू सतींदर मलिकने पंचांशी गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला. तसंच, यावेळी सामन्याचा निर्णय त्याच्या विरोधात गेल्यावर त्यांने पंचाना मारहाण केली.

सतेंदरच्या या कृत्याने त्याच्यावर कठोर कारवाई करत आजीवन बंदी घालण्यात आली आहे. पंचांना मारहाण केल्याप्रकरणी आजीवन बंदी घातल्यामुळे सतेंदर मलिक याला कॉमनवेल्थ गेम्स 2022 सह इतर कोणत्याही कुस्ती स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

नेमकं काय घडलं?

कुस्तीपटू मोहित आणि सतेंदर यांच्यातील चाचणी सामन्यादरम्यान सुरूवातील सतेंदर हा आघाडीवर होता. त्यानंतर काही वेळातच मोहीतने त्याला मॅटच्या बाहेर ढकलले. त्यावेळी पंचांनी त्याला कोणतेही गुण दिले नाही. त्याने पंचाच्या या निर्णयाला आव्हान दिले. त्याने निष्पक्षतेचा आरोप करत या निर्णयापासून हात झटकले. त्यानंतर अनुभवी पंच जगबीर सिंह यांनी या वॉर्निंगकडे त्याचे लक्ष वेधले. त्यांनी टिव्ही रिप्लेचा आधार घेत मोहीतला तीन गुण देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांचेही आकडे गुण समान राहिले मात्र शेवटी मोहीतला विजयी घोषित करण्यात आले.

या निर्णयामुळे सतेंदरचा संयम सुटला आणि तो 57 किलो वजनाच्या सामन्याच्या मॅटवर गेला जिथे रवी दहिया आणि अमन यांच्यात अंतिम सामना होत होता तिथे जगबीर देखील उपस्थित होते. त्यावेळी त्याने जगबीरला गाठून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने आधी शिवीगाळ केली आणि नंतर जगबीर यांना चापट मारली. त्याचा तोल गेला आणि तो जमिनीवर पडला. यानंतर 57 किलोचा सामना थांबवण्यात आला.

या घटनेनंतर इंदिरा गांधी स्टेडियमच्या केडी जाधव हॉलमध्ये गोंधळ झाला. भारतीय कुस्ती महासंघाच्या अधिकाऱ्यांनी सतेंदरला सभागृहाबाहेर पाठवले आणि सामना पुन्हा सुरू केला. मंचावर बसलेले डब्ल्यूएफआयचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या डोळ्यासमोर हे सर्व घडत होते. डब्ल्यूएफआयचे सहाय्यक सचिव विनोद तोमर म्हणाले की आम्ही सतेंदर मलिकवर आजीवन बंदी घातली आहे. डब्ल्यूएफआयचे अध्यक्षांनी हा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा – IPL 2022: शिखर धवन लवकरच बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण?, चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात