Commonwealth Games 2022 : सुरक्षेसाठी कुस्तीचा सामना मध्येच थांबवला; स्टेडियमही केले रिकामे

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) कुस्तीच्या सामना मध्येच थांबवण्यात आला होता. सुरक्षा तपासणीसाठी कुस्तीचा सामना थांबवत संपूर्ण स्टेडीयमही रिकामे करण्यात आले होते.

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) कुस्तीच्या सामना मध्येच थांबवण्यात आला होता. सुरक्षा तपासणीसाठी कुस्तीचा सामना थांबवत संपूर्ण स्टेडीयमही रिकामे करण्यात आले होते. मात्र, 5:15 वाजता भारतीय वेळेनुसार सामना पुन्हा सुरू करण्यात आल्याचे समजते. (wrestling match stopped in commonwealth games 2022 due to security concerns says united world wrestling)

सुरक्षा तपासणीसाठी खेळ थांबवला

युनायटेड वर्लड रेसलिंगने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली. त्यानुसार, सुरक्षा तपासणीसाठी खेळ थांबवण्यात आला असून, परवानगी मिळाल्यावर खेळ पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, आज झालेल्या कुस्ती सामन्यात भारताच्या कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी केली आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि कुस्तीपटू दीपक पुनिया यांनी कमाल करत आपले पहिले सामने जिंकले आहेत. बजरंगने नॉरूच्या लॉवे बिंघमला 4-0 ने तर दीपक पुनियाने न्यूझीलंडच्या मॅथ्यूला 10-0 ने मात दिली.

भारतीय खेळाडूंची चांगली कामगिरी

राष्ट्रकुल स्पर्धा (Commonwealth Games 2022) भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करत तब्बल 20 पदकं खिशात घातली आहेत. यामध्ये 6 सुवर्णपदकांचाही समावेश आहे. यामुळे गुणतालिकेत (Pointtable) भारत टॉप 10 मध्ये असून ताज्या आकडेवारीनुसार भारत सातव्या स्थानी विराजमान आहे.

याशिवाय, स्पर्धेच्या सुरुवातीपासून दमदार कामगिरी करत अव्वलस्थानी असणारा ऑस्ट्रेलिया आताही 132 पदकांसह अव्वलस्थानी आहे. त्यानंतर इंग्लंड 118 पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे.

भारतासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची यादी –

  • सुवर्णपदक – 6 मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर
  • रौप्यपदक – 7 संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर
  • कांस्यपदक – 7 गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह, तेजस्वीन शंकर

हेही वाचा – भारतीय पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक; हरमनप्रीत सिंगची तुफानी खेळी