Wrestling National Championship : पैलवानांना भारतीय संघात स्थान मिळवण्याचा मार्ग मोकळा; कुस्तीपटूंसाठी होणार कुस्ती रँकिंग टूर्नामेंट

राष्ट्रीय चॅम्पियनशीप आणि रँकिंग टूर्नामेंटमध्ये पहिल्या ४ स्थानावर राहणाऱ्या पैलवानांची चाचपणी होणार आहे

राष्ट्रीय चॅम्पियनशीप आणि रँकिंग टूर्नामेंटमध्ये पहिल्या ४ स्थानावर राहणाऱ्या पैलवानांची चाचपणी होणार आहे. दरम्यान यामध्ये विजेत्या पैलवानाचा राष्ट्रीय शिबिरासाठी समावेश करण्यात येणार आहे. यामुळे पैलवानांचा भारतीय संघात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत राष्ट्रीय चॅम्पियनशिपच्या पहिल्या तीन स्थानावर राहणाऱ्या पैलवानांचा राष्ट्रीय शिबिरात समावेश होत होता. मात्र आता कुस्ती संघाने जानेवारी पासून होणाऱ्या रँकिंग टूर्नामेंटच्या स्पर्धेची घोषणा केली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात होणाऱ्या या स्पर्धेमुळे पैलवानांना भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आणि आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे.

राष्ट्रीय चॅम्पियनशिप आणि रँकिंग टूर्नामेंटच्या पहिल्या ४ क्रमांकावर राहिलेल्या पैलवानांमध्ये या स्पर्धेदरम्यान एक चाचपणी करण्यासाठी सामने होतील. चाचपणीदरम्यान विजेता ठरलेल्या पैलवानाला भारतीय संघात जागा मिळवण्यासाठी राष्ट्रीय शिबिरात समावेश केला जाईल.

लक्षणीय बाब म्हणजे भारतीय कुस्ती महासंघाने पुढील राष्ट्रीय स्पर्धेत प्रत्येक राज्य आणि संस्थेतील एकच संघ सहभागी होईल असे अनिवार्य केले आहे. यामुळे हरियाणा, रेल्वे आणि लष्कराच्या संघांचे मोठे नुकसान होत आहे. या संघातील पैलवानांनी समान वजनी गटात २-२ पदक जिंकले आहेत. मात्र दुसऱ्या संघाच्या विरोधानंतर कुस्ती संघाने एक संघ उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान राज्यांच्या व संस्थांच्या कुस्तीपटूंना त्रास होऊ नये आणि भारतीय संघातील निवडीसाठी वेगळी योजना आखली पाहिजे. यासाठी कुस्ती असोसिएशनने रँकिंग स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.


हे ही वाचा: IPL 2022 : ५ महिन्यांनंतर रंगणार IPL चा रणसंग्राम; २ एप्रिल पासून १० संघासह होणार नव्या हंगामाची सुरुवात