ENG VS IND 5TH TEST : WTC 2021-23, अंतिम कसोटी रद्द झाल्यानंतर कसे मिळणार गुण?

इंग्लंड आणि भारत यांच्यात शुक्रवारपासून सुरू होणारा पाचवा आणि अंतिम सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघातील कर्मचाऱ्यांचा एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

तर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह इतर प्रशिक्षकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता प्रश्न असा आहे की, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या गुणांचे काय होईल? अंतिम सामना रद्द झाल्यानंतर, ही मालिका किती गुणांवर संपेल?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३ वर याचा महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो. कोविडचा उद्रेक पाहता सामना रद्द करण्यात आला आहे. म्हणून ही मालिका केवळ चार सामन्यांची मालिका म्हणून वर्गीकृत केली जाऊ शकते. ज्यामध्ये भारताला २-१ अशी आघाडी देत उपलब्ध गुणांची टक्केवारी मोजावी लागेल.

इंग्लंडला विजय बहाल करावा, अशी मागणी ‘ईसीबी’च्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचं सांगण्यात येतं इंग्लंड या भूमिकेला चिकटून राहिला, तर हा विवाद आयसीसीच्या विवाद निवारण समितीकडे जाऊ शकतो. जर ही चार सामन्यांची मालिका मानली गेली, तर भारत एकूण आपल्या खात्यात ४८ गुणांपैकी २६ गुण आणि इंग्लंड १४ गुण घेईल.

वर्ल्ड टेस्ट चॅंम्पियनशिप २०२१-२३ च्या गुण तालिकेत आतापर्यंत भारत २६ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान १२ गुणांसह दुसऱ्या, वेस्ट इंडीज १२ गुणांसह तिसऱ्या आणि इंगंलंडचा संघ १४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅंम्पियनशिप २०२१-२३ च्या गुनप्रणालीनुसार, एका सामन्यासाठी १२ गुण दिले जातात. यामध्ये गुणांची टक्केवारी १०० एवढी आहे. सामना अनिर्नितसाठी सहा गुण आणि ५० टक्के गुण दिले जातात. सामना ड्रॉ झाल्यास ४ आणि ३३.३३ टक्के गुण दिले जातील. पराभवासाठी शून्य गुण मिळतात. तसेच, दोन सामन्यांच्या मालिकेवर २४ गुण, तीन सामन्यांसाठी ३६ गुण, चार सामन्यांसाठी ४८ आणि पाच सामन्यांच्या मालिकेवर ६० गुण दिले जातात. स्लो ओव्हर रेटसाठी संघांना प्रत्येक शॉर्ट ओव्हरसाठी एक गुण गमावावा लागतो.


हेही वाचा : ENG VS IND 5TH TEST : पाचव्या कसोटीत इंग्लंड विजयी घोषित