Eco friendly bappa Competition
घर क्रीडा WTC final 2023 : ऑस्ट्रेलियाने उभारला धावांचा डोंगर; भारतीय संघ दुसऱ्या दिवशी चमक दाखवेल का?

WTC final 2023 : ऑस्ट्रेलियाने उभारला धावांचा डोंगर; भारतीय संघ दुसऱ्या दिवशी चमक दाखवेल का?

Subscribe

नवी दिल्ली : आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने आहे. बुधवारपासून (7 जून) सुरू लंडनमधील ओव्हल मैदानावर सुरू झालेल्या सामन्यात पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया संघ भारतीय संघावर भारी पडल्याचे दिसत आहे. पहिल्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्स गमावत 327 धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय संघ पुनरागमन करेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामन्याला होईल सुरूवात. (WTC final 2023 : Australia put up a mountain of runs; Will the Indian team shine on the second day?)

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माचा हा निर्णय योग्य ठरवत मोहम्मद सिराजने उस्मान ख्वाजा (0) बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर शार्दुल ठाकूर याने डेव्हिड वॉर्नरला (43) आणि मोहम्मद शामीने मार्नस लबुशेन (26) बाद केल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या 76 धावांवर तीन विकेट पडल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघ लवकरच सामन्यावर आपली पकड मजबूत करेल आणि ऑस्ट्रेलियाला 300 धावांच्या आधी थांबवेल असे वाटत होते. परंतु स्टिव स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी 250 धावांची भागिदारी करत भारताला बॅकफुटवर ढकलले.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाच्या 3 विकेट पडल्यानंतर स्टिव स्मिथ नाबाद 95 आणि ट्रॅव्हिस हेड नाबाद 146 धावा करत मैदानावर आहेत. कोणत्याही WTC फायनलमध्ये शतक झळकावणारा हेड हा पहिला खेळाडू ठरला आहे. या दोन्ही फलंदाजांना रोखण्यात भारतीय गोलंदाजांना अपयश आले आहे. रोहित शर्माची कोणतीच रणनिती या दोन्ही फलंदाजावर दबाव आणू शकली नाही. दुसऱ्या दिवशी हे दोन्ही फलंदाज जेव्हा मैदानावर उतरतील तेव्हा भारतीय गोलंदाजांसमोर यांना रोखण्याचे आव्हान असेल. यासोबतच ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर रोखण्यासाठी भारतीय संघाला विशेष रणनीतीही आखावी लागणार आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या नजरा आता दुसऱ्या दिवसाच्या खेळाकडे लागल्या आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -