घरक्रीडाWTC 2023 : भारतीय संघासोबत 'हे' खेळाडूही जाणार इंग्लंडला

WTC 2023 : भारतीय संघासोबत ‘हे’ खेळाडूही जाणार इंग्लंडला

Subscribe

सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगनंतर (आयपीएल) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा थरार रंगणार आहे. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगनंतर (आयपीएल) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा थरार रंगणार आहे. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. या सामन्याकडे जगभरातील सर्वांचेच लक्ष लागलं आहे. या अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघातून एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. त्यानुसार, भारतीय संघाबरोबर आणखी पाच खेळाडू हे इंग्लंडला जाणार आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणार आहे. या अंतिम सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने असून, ऑस्ट्रेलियाचा संघ आधी जाहीर करण्यात आला. त्यानंतर बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची घोषणा केली. (Wtc Final 2023 Ind Vs Aus Sarfaraz Khan Ruturaj Gaikwad Ishan Kishan Standbys In Team India)

- Advertisement -

या दौऱ्यात निवडलेल्या भारतीय संघाचे 15 सदस्य इंग्लंडला जाणार आहेत. यांच्यासोबतच आणखी खेळाडूही भारतीय संघासोबत राहू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. त्यानुसार, सरफराज खान, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, नवदीप सैनी हे देखील इंग्लंडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण हे सर्व खेळाडू स्टँडबाय म्हणून जातील.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघ एक सराव सामनाही खेळणार असल्याची माहिती समोर येत आहे. स्टँडबाय म्हणून जाणारे खेळाडू तेव्हाच संघात स्थान मिळवू शकतात जेव्हा मुख्य संघातील एखादा खेळाडू जखमी होतो किंवा आजारी पडतो. हे खेळाडू त्याचा बदली खेळाडू म्हणून खेळत आहेत.

- Advertisement -

भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मा, के.एल. राहुल आणि शुभमन गिल हे तीन सलामीवीर असून, गायकवाडचीही चर्चा सुरू आहे. दुसरीकडे केएस भरतची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. गरज पडल्यास केएल राहुल देखील कीपिंग करू शकतो. परंतु आता स्टँडबाय खेळाडू म्हणून इशान किशनचे नाव पुढे आले आहे, जो कीपिंग करू शकतो. वेगवान गोलंदाजीत गरज पडल्यास मुकेश कुमार आणि नवदीप सैनी ही पोकळी भरून काढण्याचे काम करू शकतात.


हेही वाचा – जगभरातून मिळालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांनंतर सचिनने मानले ‘असे’ आभार…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -