घर क्रीडा WTC Final 2023 : भारतीय संघावर...; अंतिम सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे...

WTC Final 2023 : भारतीय संघावर…; अंतिम सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचे महत्त्वाचे विधान

Subscribe

नवी दिल्ली : आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ आमनेसामने येणार आहेत. उद्या (7 जून) लंडनमधील ओव्हल मैदानावर दोन्ही संघामध्ये सामाना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भारतीय संघावर कोणतेही दडपण नसल्याचे महत्त्वाचे विधान केले आहे.

भारतीय संघाने मागील 10 वर्षांपासून आयसीसीचे कोणतेही विजेतेपद जिंकलेले नाही. याशिवाय भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. भारतीय संघाला 2021 मध्ये साऊथॅम्पटन येथे न्यूझीलंडकडून अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे अशा परिस्थितीत अंतिम सामना जिंकून आयसीसीचेही जेतेपद जिंकण्याचा दबाव भारतीय संघावर असणार आहे. मात्र राहुल द्रविड यांनी कोणतेही दडपण नसल्याचे वक्तव्य केले आहे. (WTC Final 2023 : Important statement of head coach Rahul Dravid before the final match)

- Advertisement -

राहुल द्रविड म्हणाला की, भारतीय संघावर आयसीसीचे विजेतेपद जिंकण्याचे कोणतेही दडपण नाही. ट्रॉफी जिंकण्याचा आनंद असतो त्याहून जास्त आनंद आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याचा असतो. भारतीय संघाने इथपर्यंत पोहचून दोन वर्षांच्या मेहनतीचे फळ कमवले आहे. ऑस्ट्रेलियासोबत मालिका जिंकणे आणि इंग्लंडमध्ये मालिका अनिर्णित ठेवणे, अशा अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. याशिवाय भारतीय संघ गेल्या 5-6 वर्षांत जगभर खेळला आहे. त्यामुळे आयसीसी ट्रॉफी नसल्यामुळे आतापर्यंत कमावलेले यश बदलणार नाही. पण यावेळी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकणे महत्त्वाचे आहे. क्रिकेटमधील कोणताही खेळ जिंकायचाच असतो, असे द्रविड म्हणाला.

- Advertisement -

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याआधी क्रिकेट तज्ज्ञ आपला आवडता संघ निवडत आहेत. याशिवाय काही लोक भारतीय संघाला विजयाची प्रबळ दावेदार म्हणत आहेत, याबाबत विचारले असता द्रविड म्हणाला की, येत्या 5 दिवसात निकाल आपल्या समोर असेल. त्यामुळे जी काही चर्चा सुरू आहे, त्याला काही अर्थ राहणार नाही. दोन संघ आमनेसामने असणार आहेत, दोघांकडे चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे चांगला खेळ करून 20 विकेट्स घेण्याबरोबरच जास्त धावा केल्या तर मला खात्री आहे की, आम्ही जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना नक्कीच जिंकू, असा विश्वास राहुल द्रविड याने व्यक्त केला.

रहाणेसारखा खेळाडू संघात असणे फायदेशीर
राहुल द्रविडने अजिंक्य रहाणेविषयी बोलताना स्तुतीसुमने उधळली आहेत. द्रविड म्हणाला की, अजिंक्य रहाणे संघात खेळण्याची संधी मिळाली आहे. तो भारतीय संघासाठी फायदेशीर ठरणार आहे. काही खेळाडू दुखापग्रस्त झाल्यामुळे त्याला पुन्हा संघात स्थान मिळाले असले तरी त्याच्यासारखा खेळाडूंचा संघात असणयाचा फायदा होणार आहे. इंग्लंडमध्येही रहाणेने भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची खेळी केली होती. याशिवाय तो स्लिपमध्ये शानदार झेल पकडतो, असे द्रविड म्हणाला.

- Advertisment -