घर क्रीडा WTC Final 2023 : सुनील गावस्कर यांनी निवडली भारताची प्लेइंग 11

WTC Final 2023 : सुनील गावस्कर यांनी निवडली भारताची प्लेइंग 11

Subscribe

मुंबई : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर ७ ते ११ जून २०२३ दरम्यान खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) भारताची प्लेइंग 11 जाहीर केली आहे. या 11 खेळाडूंमध्ये त्यांनी बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब असणाऱ्या अनुभवी खेळाडूला संधी दिली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी (25 एप्रिल) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) 2023 फायनलसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. ही घोषणा करताना अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) पुनरागमनाची संधी दिली आहे. बीसीसीआयने WTC च्या अंतिम सामन्यासाठी संघ जाहीर करताना रोहित शर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे, याशिवाय शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट यांना संधी दिली आहे.

- Advertisement -

WTC च्या अंतिम सामन्यासाठी संघ जाहीर झाल्यानंतर भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अजिंक्य रहाणेच्या पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांनी मधल्या फळीत श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत अनुभवी फलंदाजाला संधी मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले.

रणजी ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरीमुळे रहाणेला संधी मिळाली
एका वृत्तसंस्थेशी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, “भारतीय संघात बदलाची नितांत गरज होती. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर असल्यामुळे त्याच्या जागी अनुभवी फलंदाजाची गरज होती आणि अजिंक्य रहाणेला संधी देऊन बीसीसीआयने योग्य केले आहे. आयपीएलमधील फॉर्मच्या जोरावर त्याला WTC अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात संधी मिळालेली नाही. त्याने मुंबईकडून खेळताना रणजी ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांना WTC अंतिम सामन्यासाठी प्लेइंग 11 साठी तुम्ही कोणाला संधी देणार असे विचारले असता, त्यांनी सांगितले की, केएस भरतपेक्षा केएल राहुलला यष्टिरक्षक म्हणून प्राधान्य देणे गरजेचे आहे, तर उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर यांच्यासोबत जयदेव उनाडकटला तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून निवड करणे गरजेचे आहे.

- Advertisement -

अशी असेल प्लेइंग 11
गावस्कर म्हणाले की, रोहित शर्मा आणि शुभमन गिलला सलामीसाठी येतील. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा, चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे येईल. सहाव्या क्रमांकावर केएल राहुल खेळताना दिसेल आणि तो यष्टीरक्षणाची भूमिकाही बजावेल. त्यानंतर सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा आणि आठव्या क्रमांकावर रविचंद्रन अश्विन असेल. हे दोघे फिरकी विभागाची जबाबदारी सांभाळतील. नवव्या क्रमांकावर मोहम्मद शमी, दहाव्या क्रमांकावर मोहम्मद सिराज आणि अकराव्या क्रमांकावर जयदेव उनाडकट खेळताना दिसतील आणि वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.

- Advertisment -