Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा WTC Final : न्यूझीलंडवर दबाव टाकण्यासाठी भारताची चांगली फलंदाजी गरजेची; सचिनचे मत

WTC Final : न्यूझीलंडवर दबाव टाकण्यासाठी भारताची चांगली फलंदाजी गरजेची; सचिनचे मत

न्यूझीलंडला पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी मिळाली.

Related Story

- Advertisement -

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना सध्या सुरु आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव पाचव्या दिवशी २१७ धावांत आटोपला होता. याचे उत्तर देताना न्यूझीलंडने २४९ धावा केल्याने त्यांना पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी मिळाली. आता या सामन्याचा पाचवा दिवस सुरु असला तरी पावसामुळे हा सामना आणखी एक दिवस खेळला जाणार आहे. आयसीसीने या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. भारताने उर्वरित पाचवा दिवस आणि सहाव्या दिवशी आपल्या दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करणे गरजेचे आहे, असे भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला वाटते. तसेच भारताने चांगली फलंदाजी केली, तरच न्यूझीलंडच्या संघावर दडपण येईल, असेही सचिनने सांगितले.

शमी, ईशांतची उत्तम गोलंदाजी

मोहम्मद शमी आणि ईशांत शर्माने उत्तम गोलंदाजी केली. भारताने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत गोलंदाजांना चांगली साथ दिली. न्यूझीलंडकडून विल्यमसनच्या साथीने जेमिसन आणि साऊथी यांनी महत्त्वाच्या धावा केल्या. या सामन्यात आता साधारण १३० षटकांचा खेळ शिल्लक असून न्यूझीलंडवर दबाव टाकण्यासाठी भारताने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करणे गरजेचे आहे, असे सचिनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले.

न्यूझीलंडला पहिल्या डावात आघाडी 

- Advertisement -

भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या होत्या. याचे उत्तर देताना न्यूझीलंडने २४९ धावा करत पहिल्या डावात आघाडी मिळवली. न्यूझीलंडच्या डेवॉन कॉन्वे (५४) आणि कर्णधार केन विल्यमसन (४९) यांनी झुंजार खेळी केल्या. भारताकडून शमीने चार, ईशांतने तीन, अश्विनने दोन आणि जाडेजाने एक विकेट घेतली.

- Advertisement -