घरक्रीडाWTC Final : रोहितसोबत गिलऐवजी ‘या’ फलंदाजाला सलामीला पाठवा; न्यूझीलंडच्या माजी प्रशिक्षकांचा सल्ला

WTC Final : रोहितसोबत गिलऐवजी ‘या’ फलंदाजाला सलामीला पाठवा; न्यूझीलंडच्या माजी प्रशिक्षकांचा सल्ला

Subscribe

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला १८ जूनपासून सुरुवात होईल. 

भारत आणि इंग्लंड यांच्यात पुढील शुक्रवारपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाला या सामन्याआधी कसोटी सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. याऊलट न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या सरावाचा न्यूझीलंडला अंतिम सामन्यात फायदा होईल असे अनेकांना वाटत आहे. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी काही दिवस कसोटी सामने खेळल्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना थकवा जाणवू शकेल, असे मत न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांनी व्यक्त केले. तसेच अंतिम सामन्यात भारताने रोहित शर्मासोबत सलामीला शुभमन गिलऐवजी मयांक अगरवालला संधी दिली पाहिजे, असेही हेसन म्हणाले.

मयांकचा अनुभव ठरेल फायदेशीर

भारतीय संघ अंतिम सामन्यात रोहित आणि शुभमन गिल यांची सलामीवीर म्हणून निवड करेल असे मला वाटते. मात्र, त्यांनी मयांकला संधी देण्याचा विचार केला पाहिजे. त्याला न्यूझीलंडच्या गोलंदाजांना न्यूझीलंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. हा अनुभव भारतासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकेल, असे हेसन यांनी सांगितले. भारतीय संघाने मागील वर्षी न्यूझीलंडचा दौरा केला होता. या दौऱ्यातील कसोटी मालिका भारताने ०-२ अशी गमावली होती. या मालिकेत भारताकडून मयांकने सर्वाधिक १०२ धावा केल्या होत्या.

- Advertisement -

गोलंदाजांची काळजी घ्यावी लागेल

तसेच अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडला आपल्या गोलंदाजांची काळजी घ्यावी लागेल, असे हेसन यांना वाटते. इंग्लंडविरुद्धचे दोन कसोटी सामने आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना, या तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळाडूंना केवळ चार-चार दिवसांची विश्रांती मिळणार आहे. न्यूझीलंडला आपल्या गोलंदाजांची काळजी घ्यावी लागेल. त्यामुळेच बहुधा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ट्रेंट बोल्ट खेळेल. आता त्याचे पुनरागमन झाल्याने इतर गोलंदाजांना विश्रांती मिळू शकेल, असे हेसन म्हणाले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -