घरक्रीडाWTC Final : बुमराह, शमीसोबत ईशांत नको, ‘या’ गोलंदाजाला संधी द्या; संजय मांजरेकरांचे...

WTC Final : बुमराह, शमीसोबत ईशांत नको, ‘या’ गोलंदाजाला संधी द्या; संजय मांजरेकरांचे मत 

Subscribe

इंग्लंडमध्ये क्रिकेट मोसमाच्या सुरुवातीला चेंडू खूप स्विंग होतो. या परिस्थितीत हा गोलंदाज भेदक मारा करू शकेल.

भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याला १८ जूनपासून सुरुवात होणार असून भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. या सामन्यात भारतीय संघ जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा या तेज त्रिकुटासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. परंतु, भारताने ईशांतच्या ऐवजी मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला संधी दिली पाहिजे, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी व्यक्त केले. इंग्लंडमध्ये क्रिकेट मोसमाच्या सुरुवातीला चेंडू खूप स्विंग होतो. या परिस्थितीत ईशांत किंवा मोहम्मद सिराजपेक्षा शार्दूल भेदक मारा करू शकेल, असे मांजरेकर यांना वाटते.

परिस्थितीचा फायदा करून घेऊ शकेल

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना हा इंग्लंडमधील क्रिकेट मोसमाच्या पूर्वार्धात होणार आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यानंतर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून मी शार्दूल ठाकूरला पसंती देईन. शार्दूल स्विंग गोलंदाज आहे. तो इंग्लंडमधील परिस्थितीचा जास्त फायदा करून घेऊ शकेल, असे मांजरेकर म्हणाले.

- Advertisement -

स्विंग करणाऱ्या गोलंदाजाची उणीव भासली

भारतीय संघ मागील वर्षी न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारताला स्विंग गोलंदाजाची उणीव भासली. भारतीय फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही हे खरे आहे. परंतु, न्यूझीलंडला विजय मिळवण्यात यश आले, कारण त्यांच्याकडे चेंडू स्विंग करून शकतील असे गोलंदाज आहेत. या गोलंदाजांनी परिस्थितीनुसार गोलंदाजी केली. त्यामुळे आता भारतानेही परिस्थितीनुसार गोलंदाज निवडले पाहिजेत, असेही मांजरेकर यांनी सांगितले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -