घरक्रीडाWTC Final : अरे! बुमराह जर्सी घालायला विसरला आणि मग...

WTC Final : अरे! बुमराह जर्सी घालायला विसरला आणि मग…

Subscribe

पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर मजेशीर प्रकार घडला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना सध्या सुरु आहे. या सामन्याचा पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे वाया गेला. या दोन दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी काही षटकांचा खेळ झाला. पाचव्या दिवशी मात्र पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्याने सामना सुरु झाला आहे. पाचव्या दिवसाच्या (आज) सुरुवातीला पाऊस न झाल्याने खेळ वेळेवर सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सामना सुरु होण्याआधी काही मिनिटे पाऊस झाल्याने खेळपट्टीवर कव्हर्स घालावी लागली. त्यामुळे आजही सामना काहीसा उशिराने सुरु झाला. सामना सुरु झाल्यावर न्यूझीलंडचे फलंदाज अखेर मैदानात उतरले. परंतु, त्यावेळी मजेशीर प्रकार घडला.

जर्सी बदलणे भाग पडले

पाचव्या दिवसाचे पहिले षटक भारताकडून जसप्रीत बुमराहने टाकले. मात्र, त्यावेळी तो नेमकी कोणती जर्सी घालायची हेच विसरला. त्याने भारताची नियमित कसोटी जर्सी घातली, ज्यावर मध्यभागी ‘BYJU’S’चा लोगो होता. तसेच उजव्या बाजूला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ऐवजी ‘MPL’ चा लोगो होता. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक स्पर्धांमध्ये कोणत्याही कंपनीचा लोगो जर्सीच्या पुढच्या बाजूला लावण्याची परवानगी नसते. त्यामुळे बुमराहला पॅव्हेलियनमध्ये परत जाऊन जर्सी बदलणे भाग पडले. त्यानंतर तो मध्यभागी ‘INDIA’ असे लिहिलेली जर्सी घालून मैदानात परतला. बुमराह कोणती जर्सी घालायची हे विसरल्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली.

- Advertisement -

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -