घरक्रीडाWTC Final : भारत-न्यूझीलंड सामना रंगात; आज पावसाची कामगिरी कशी असेल?

WTC Final : भारत-न्यूझीलंड सामना रंगात; आज पावसाची कामगिरी कशी असेल?

Subscribe

आज पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता मिळू शकेल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्याचे पहिले चार दिवस पावसाने जोरदार बॅटिंग केली होती. त्यामुळे पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकताच रद्द करणे भाग पडले होते. परंतु, पाचव्या दिवशी पावसाने विश्रांती घेतल्याने जवळपास पूर्ण दिवसाचा खेळ झाला. पाचव्या दिवशी दोन्ही संघांनी केलेल्या झुंजार खेळामुळे हा अंतिम सामना चांगलाच रंगात आला आहे. त्यामुळे राखीव म्हणजेच सहाव्या दिवसाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यातच साऊथहॅम्पटनचे आजचे हवामान दिलासादायक आहे. पहिले पाचही दिवस ढगाळ वातावरण होते. मात्र, आजच्या म्हणजेच सहाव्या दिवशी ऊन पडणार असून पावसाची शक्यता ५ टक्क्यांहूनही कमी आहे.

भारताकडे सध्या ३२ धावांची आघाडी

साऊथहॅम्पटन येथे आज सकाळच्या सत्रात कमाल तापमान हे १९ डिग्री इतके असणार आहे, तर दुपारच्या वेळी तापमान थोडे वाढून २३ डिग्रीपर्यंत जाऊ शकेल. तसेच ढगाळ वातावरणाची शक्यता २५ टक्क्यांहूनही कमी आहे. त्यामुळे आज पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता मिळू शकेल. सहाव्या दिवशी भारतीय संघ दुसऱ्या डावात २ बाद ६४ वरून पुढे खेळण्यास सुरुवात करेल. भारताकडे सध्या ३२ धावांची आघाडी असून चेतेश्वर पुजारा (नाबाद १२) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद ८) हे सध्या खेळपट्टीवर आहेत. तसेच दिवसभर ऊन असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी धावा करणे फलंदाजांना पहिल्या दिवसांच्या तुलनेत सोपे जाऊ शकेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -