Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा WTC Final : न्यूझीलंडला पहिल्या डावात आघाडी; शमीने घेतल्या चार विकेट

WTC Final : न्यूझीलंडला पहिल्या डावात आघाडी; शमीने घेतल्या चार विकेट

न्यूझीलंडच्या विल्यमसनने १७७ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ४९ धावांची खेळी केली.

Related Story

- Advertisement -

कर्णधार केन विल्यमसनच्या संयमी खेळीमुळे भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पहिल्या डावात आघाडी मिळाली. या सामन्याचे पहिले चार दिवस पावसाने जोरदार बॅटिंग केली होती. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्याने पाचव्या दिवसाचा खेळ होऊ शकला. या सामन्यात भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला होता. याचे उत्तर देताना न्यूझीलंडने २४९ धावा केल्याने त्यांना पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी मिळाली. कर्णधार विल्यमसनने संयमाने फलंदाजी करत १७७ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ४९ धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद शमीने ७६ धावांत सर्वाधिक चार विकेट घेतल्या.

टीम साऊथीच्या उपयुक्त ३० धावा

- Advertisement -

न्यूझीलंडने पाचव्या दिवशी २ बाद १०१ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. शमीने रॉस टेलर (११), बीजे वॉटलिंग (१), कॉलिन डी ग्रँडहोम (१३) आणि कायेल जेमिसन (२१) यांना फारशा धावा करू दिल्या नाहीत. एका बाजूला विकेट जात असताना विल्यमसनने एक बाजू लावून धरली. परंतु, त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याला आणि हेन्री निकोल्सला (७) ईशांत शर्माने बाद केले. टीम साऊथीने काही चांगले फटके मारत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३० धावांची खेळी केल्यावर त्याला रविंद्र जाडेजाने बाद केले. त्यामुळे न्यूझीलंडचा डाव २४९ धावांत आटोपला. भारताकडून शमीने चार, ईशांतने तीन, अश्विनने दोन आणि जाडेजाने एक विकेट घेतली.

 

- Advertisement -