Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनण्यासाठी न्यूझीलंडला १३९ धावांचे आव्हान

WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनण्यासाठी न्यूझीलंडला १३९ धावांचे आव्हान

भारताचा दुसरा डाव १७० धावांत आटोपला.

Related Story

- Advertisement -

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. साऊथहॅम्पटन येथे होत असलेला हा सामना जिंकत पहिले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्यासाठी चौथ्या डावात न्यूझीलंडला १३९ धावांचे आव्हान मिळाले आहे. सहाव्या दिवशी भारताचा दुसरा डाव केवळ १७० धावांत आटोपला. भारताकडून रिषभ पंत (४१) आणि सलामीवीर रोहित शर्मा (३०) यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र, भारताच्या इतर फलंदाजांना २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. न्यूझीलंडच्या टीम साऊथीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याला ट्रेंट बोल्टने तीन, कायेल जेमिसनने दोन आणि निल वॅग्नरने एक विकेट घेत उत्तम साथ दिली.

पंतने केली ४१ धावांची खेळी

- Advertisement -

या सामन्यात भारताने पहिल्या डावात २१७ धावा केल्या होत्या. याचे उत्तर देताना न्यूझीलंडने २४९ धावा करत पहिल्या डावात ३२ धावांची मिळवली होती. भारताचा दुसरा डाव १७० धावांत आटोपला. सहाव्या दिवशी भारताने २ बाद ६४ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. त्यांनी उर्वरित आठ विकेट या १०६ धावांत गमावल्या. पंतने झुंजार फलंदाजी करत ८८ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. त्याला रविंद्र जाडेजाची (१६) काहीशी साथ लाभली. परंतु, हे दोघे बाद झाल्यावर भारताचा डाव गडगडला.

 

- Advertisement -