घरक्रीडाWTC Final : न्यूझीलंडचे पारडे जड, ‘या’ गोष्टीचा होईल फायदा; पुजाराचे मत

WTC Final : न्यूझीलंडचे पारडे जड, ‘या’ गोष्टीचा होईल फायदा; पुजाराचे मत

Subscribe

इंग्लंडमधील बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणे, हे खेळाडूंपुढील सर्वात मोठे आव्हान असल्याचे पुजारा म्हणाला.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (जागतिक कसोटी अजिंक्यपद) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला येत्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. साऊथहॅम्पटन येथे होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारताला बराच काळ कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. भारतीय खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळत होते, पण कोरोनामुळे ही स्पर्धा मागील महिन्यात अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर इंग्लंडमध्ये दाखल झाल्यावर भारतीय खेळाडूंनी आपापसातच सामना खेळला. याऊलट न्यूझीलंडने नुकतीच इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. अंतिम सामन्यापूर्वी दोन कसोटी सामने खेळणे न्यूझीलंडला फायदेशीर ठरेल, असे मत भारताचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले.

आम्ही सर्वोत्तम खेळ करू

अंतिम सामन्यापूर्वी दोन कसोटी सामने खेळल्याचा न्यूझीलंडला नक्कीच फायदा होईल. परंतु, अंतिम सामन्यात आम्ही जिद्दीने, आमचा सर्वोत्तम खेळ करू. आमच्या संघात दमदार कामगिरी करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची क्षमता आहे. त्यामुळे आम्हाला फार सराव मिळाला नसल्याची चिंता नाही. या सामन्याच्या तयारीसाठी जितके दिवस मिळतील, त्यात आम्ही जास्तीजास्त सराव करण्याचा प्रयत्न करू. आम्ही अंतिम सामन्यासाठी पूर्णपणे तयार असू, असे पुजाराने सांगितले.

- Advertisement -

वातावरणाशी जुळवून घेणे आव्हान 

तसेच इंग्लंडमधील बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणे, हे खेळाडूंपुढील सर्वात मोठे आव्हान असल्याचे पुजारा म्हणाला. इंग्लंडमधील वातावरण सतत बदल असते. त्यामुळे फलंदाज म्हणून या वातावरणाशी जुळवून घेणे हे मोठे आव्हान आहे. इंग्लंडमध्ये कधीही पाऊस पडू शकतो. तसे झाल्यास तुम्हाला मैदानाबाहेर जावे लागते आणि पाऊस थांबल्यावर तुम्हाला मैदानात येऊन पुन्हा फलंदाजीला नव्याने सुरुवात करावी लागते. त्यामुळे तुम्ही फलंदाज म्हणून मानसिकदृष्ट्या कणखर असणे गरजेचे आहे, असेही पुजारा म्हणाला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -