घरक्रीडाWTC Final : न्यूझीलंडच्या संघाची घोषणा; कर्णधार विल्यमसन खेळण्यासाठी सज्ज

WTC Final : न्यूझीलंडच्या संघाची घोषणा; कर्णधार विल्यमसन खेळण्यासाठी सज्ज

Subscribe

न्यूझीलंडच्या १५ सदस्यीय संघात एक अष्टपैलू आणि पाच वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात येत्या शुक्रवारपासून पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (जागतिक कसोटी अजिंक्यपद) स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी न्यूझीलंडच्या १५ सदस्यीय संघाची मंगळवारी घोषणा करण्यात आली. साऊथहॅम्पटन येथे होणाऱ्या या अंतिम सामन्यासाठी कर्णधार केन विल्यमसन उपलब्ध असणार आहे, अशी माहिती न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी दिली. कोपराला झालेल्या दुखापतीमुळे विल्यमसन नुकत्याच झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत टॉम लेथमने न्यूझीलंडचे नेतृत्व केले होते. परंतु, आता विल्यमसन भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी सज्ज आहे.

विश्रांतीचा झाला फायदा

न्यूझीलंडचा यष्टीरक्षक बीजे वॉटलिंगही पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकला होता. परंतु, आता त्यालाही अंतिम सामन्यासाठी न्यूझीलंडच्या १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. ‘केन आणि बीजे यांना एक आठवड्याची विश्रांती मिळाल्याचा फायदा झाला. हे दोघेही फिट असून अंतिम सामन्यात खेळणे आम्हाला अपेक्षित आहे,’ असे न्यूझीलंडचे प्रशिक्षक स्टीड म्हणाले.

- Advertisement -

एजाज पटेल एकमेव फिरकीपटू

न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी २० जणांचा संघ निवडला होता. त्यापैकी डग ब्रेसवेल, जेकब डफी, डेरेल मिचेल, रचिन रविंद्र आणि मिचेल सँटनर यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीच्या संघातून वगळण्यात आले आहे. या संघात अष्टपैलू म्हणून कॉलिन डी ग्रँडहोम आणि फिरकीपटू म्हणून एजाज पटेल यांना स्थान मिळाले आहे.

न्यूझीलंडचा संघ : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लेथम, डेवॉन कॉन्वे, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, विल यंग, बीजे वॉटलिंग (यष्टीरक्षक), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), कॉलिन डी ग्रँडहोम, ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी, मॅट हेन्री, कायेल जेमिसन, निल वॅग्नर, एजाज पटेल.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -