घरक्रीडाWTC Final : पाऊस गेला, टॉस झाला! न्यूझीलंडच्या संघात पाच वेगवान गोलंदाज

WTC Final : पाऊस गेला, टॉस झाला! न्यूझीलंडच्या संघात पाच वेगवान गोलंदाज

Subscribe

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्याला गुरुवारपासून सुरुवात होणार होती. परंतु, पावसामुळे पहिल्या दिवशी एकही चेंडू टाकला गेला नाही. शनिवारी मात्र पाऊस थांबल्याने सामन्याला अखेर सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने गुरुवारीच आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली होती. न्यूझीलंडने मात्र नाणेफेकीच्या वेळी आपला संघ जाहीर केला.

त्यांनी या सामन्यासाठी पाच वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. यात ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी, कायेल जेमिसन आणि निल वॅग्नर यांच्यासह वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोमचा समावेश आहे. त्यांनी या सामन्यासाठी एकाही फिरकीपटूला संघात स्थान दिलेले नाही.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -