घरक्रीडाWTC Final: सचिनने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण; पंतच्या फलंदाजीवरही ठेवलं बोट

WTC Final: सचिनने सांगितलं भारताच्या पराभवाचं कारण; पंतच्या फलंदाजीवरही ठेवलं बोट

Subscribe

साऊथहॅम्पटन येथे झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून भारतीय संघ पराभूत झाला. अंतिम सामन्यातील दोन दिवस पावसामुळे वाया गेले. मात्र, न्यूझीलंडने दर्जेदार कामगिरी करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन बनण्याचा मान पटकावला. भारताला मात्र आपली सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयश आले आणि भारताची टेस्ट चॅम्पियनशिप हुकली. परंतु, भारताच्या या पराभवामागच्या कारणांवर चर्चा सुरु आहे. या चर्चेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने देखील सहभाग घेतला असून त्याने देखील भारताच्या पराभवाचं कारण सांगितलं आहे. तसंच, रिषभ पंतच्या फलंदाजीवर देखील बोट ठेवलं.

भारतीय संघाने न्यूझीलंडला विजयासाठी १३९ धावांचे लक्ष्य दिलं. केन विल्यमसन आणि त्याच्या संघाने भारताचा ८ गडी राखून पराभव करत पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाचं कारण सचिन तेंडूलकरने सांगितलं असून या सामन्यात दुसऱ्या डावात ४१ धावा करणाऱ्या रिषभ पंतच्या फलंदाजीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

सचिन तेंडुलकर आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “मी सांगितलं होतं की शेवटच्या दिवसाची पहिली १० षटके महत्त्वाची ठरतील. जर आम्ही ड्रिंक्स ब्रेक पर्यंत टीकू शकलो तर आमच्याकडे फटकेबाजी करणारे खेळाडू होते. भारताला भागिदारीची गरज होती. पहिल्या १०-१२ षटकांत गडी बाद न होणे महत्त्वाचं होतं. परंतु त्याच वेळी न्यूझीलंडला कोहली आणि पुजाराला बाद करण्यात यश आलं. दोघेही लवकर बाद झाला आणि रहाणेही बाद झाला, ज्यामुळे भारतावर दबाव कायम राहिला, असं सचिन तेंडूलकर म्हणाला. रिषभ पंत खेळपट्टीवर आल्यानंतर शॉट खेळण्याचा आणि धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून काही धावा करता येतील, परंतु त्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -