घरक्रीडाWTC Final : न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातील पहिले जगज्जेतेपद पटकावण्याविषयी कर्णधार विल्यमसन म्हणतो...

WTC Final : न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातील पहिले जगज्जेतेपद पटकावण्याविषयी कर्णधार विल्यमसन म्हणतो…

Subscribe

न्यूझीलंडला याआधी एकदिवसीय किंवा टी-२० क्रिकेटमध्ये एखादी जागतिक स्पर्धा जिंकता आलेली नाही.

जागतिक क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला सर्वात बलाढ्य संघ मानल्या जाणाऱ्या भारताला पराभूत करत न्यूझीलंडने पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचे जेतेपद पटकावले. हे न्यूझीलंडचे पहिलेच जगज्जेतेपद ठरले. न्यूझीलंडला याआधी एकदिवसीय किंवा टी-२० क्रिकेटमध्ये एखादी जागतिक स्पर्धा जिंकता आलेली नाही. त्यांना २०१५ आणि २०१९ एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. परंतु, केन विल्यमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंडने पहिलीवहिली कसोटी अजिंक्यपदाची गदा पटकावली. भारताविरुद्धचा हा विजय न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा आणि खास होता, असे विल्यमसन म्हणाला.

प्रत्येक खेळाडूची भूमिका महत्त्वाची 

मी आता बरीच वर्षे न्यूझीलंड क्रिकेटचा भाग आहे. त्यामुळे आमच्या (न्यूझीलंड) क्रिकेट इतिहासातील पहिले जगज्जेतेपद पटकावणे हे खूप खास आहे. मागील दोन वर्षांत २२ खेळाडूंनी न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले असून आमच्या या जेतेपदात यापैकी प्रत्येक खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आमच्यासाठी हा विजय सर्वात मोठा आहे, असे भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यानंतर विल्यमसन म्हणाला.

- Advertisement -

स्टार खेळाडूंची भरणा नाही

आमच्या संघात स्टार खेळाडूंची भरणा नाही. आम्ही फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या प्रत्येक क्षेत्रात योगदान देतील अशा खेळाडूंवर अवलंबून असतो. भारतासारख्या संघाला पराभूत करणे सोपे नाही. त्यामुळे आमच्यासाठी हा विजय सर्वात मोठा आहे, असेही विल्यमसनने सांगितले. भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी १३९ धावांचे आव्हान दिले होते, जे त्यांनी ८ विकेट राखून पूर्ण केले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -