श्रीलंकेच्या ‘या’ गोलंदाजाने घेतल्या 10 विकेट, बांगलादेशचा पराभव करत WTC मध्ये मिळवले दुसरे स्थान

बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील कसोटी मालिका (Test Match) श्रीलंकेने 1-0 ने जिंकली. मिरपूर येथे झालेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाज असिथा फर्नांडोने (Asitha Fernando) 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

बांगलादेश (Bangladesh) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील कसोटी मालिका (Test Match) श्रीलंकेने 1-0 ने जिंकली. मिरपूर येथे झालेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाज असिथा फर्नांडोने (Asitha Fernando) 10 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. तसेच, फर्नांडोने सामनावीराचा मानही पटकावला. या विजयासह श्रीलंकेने 12 गुणांची कमाई करत विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत (World Test Championship) दुसरा क्रमांक पटकावला. या यादीत ऑस्ट्रेलियन (Australia) संघ 72 गुणांसह अव्वल आहे.

पहिल्या डावात 365 धावा

बांगलादेशने पहिल्या डावात 365 धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेने प्रत्यु्त्तरात संघाची धावसंख्या 506 पर्यत नेली. त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या डावात असिथा फर्नांडो याच्या उत्तम गोलंदाजीमुळे बांगलादेशचा डाव 169 धावांत आटोपला. त्यानंतर विजयासाठी आवश्यक 29 धावा करत श्रीलंकेने सामन्यासह मालिका खिशात घातली.

कसोटी मालिकेच्या पहिल्या डावात बांगलादेशकडून मुश्फीकूर रहीमने नाबाद 175 आणि लिटन दासने 141 धावा करत संघाला 365 धावांपर्यंत पोहोचवले. त्यावेळी या डावात श्रीलंकेचे गोलंदाज फर्नांडोने 4 तर रंजिथाने 5 विकेट घेतल्या.

अँजेलो मॅथ्यूजच्या नाबाद 145 धावा

प्रत्युत्तरात अँजेलो मॅथ्यूजच्या नाबाद 145 धावा, दिनेश चंडीमलच्या 124 धावा आणि दिमुथ करूणरत्नेच्या 80 धावांच्या जोरावर श्रीलंकेने 506 धावा केल्या. शाकीब अल हसनने 5 तर इबादत होसेनने ४ गडी बाद केले. दुसऱ्या डावात बांगलादेशचा डाव गडबडला. असिथा फर्नांडोने 17.3 षटकांत 51 धावा देऊन 6 बळी घेतले. त्याला रंजिथाने साथ देत 2 गडी बाद केले.

शाकिब अल हसनने 58 धावांची खेळी केली. पहिल्या डावात दीडशतक हुकलेल्या लिटन दासने दुसऱ्या डावात अतिशय संथ खेळी केलीय त्याने 135 धावांमध्ये 52 धावा केल्या. अखेर श्रीलंकेला विजयासाठी केवळ 29 धावांचे आव्हान मिळाले. ओशादा फर्नांडोने 9 चेंडूत नाबाद 21 धावा कुटत संघाला विजय मिळवून दिला.


हेही वाचा – BAN vs SL: श्रीलंकेचा ‘हा’ खेळाडू सामना सुरू असतानाच रुग्णालयात दाखल, डॉक्टर म्हणाले…