घरक्रीडावूर्केरी रामन यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती

वूर्केरी रामन यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती

Subscribe

रमेश पोवार, वेंकटेश प्रसाद आणि गॅरी कर्स्टन यांना मागे टाकत रामन यांची प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.

भारताचे माजी सलामीवीर वूर्केरी व्यंकट रामन यांची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. मात्र, याबाबतची अधिकृत घोषणा बीसीसीआयने केलेली नाही. प्रशिक्षकपदासाठी निवडक १० जणांच्या गुरुवारी मुलाखती झाल्यानंतर कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या समितीने रामन, वेंकटेश प्रसाद आणि भारतीय पुरुष संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांची नावे बीसीसीआयला सुचवली. तसेच  या तिघांच्या समितीचे प्रशिक्षकपदासाठी कर्स्टन यांना प्राधान्य होते. मात्र ते आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे प्रशिक्षकपद सोडण्यास तयार नसल्यामुळे बीसीसीआयने रामन यांची महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

२०१५ पासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी प्रशिक्षक  

वूर्केरी व्यंकट रामन यांनी भारतीय संघाचे ११ कसोटी आणि २७ एकदिवसीय सामन्यांत प्रतिनिधित्व केले होते. तसेच यापूर्वी ते बंगाल आणि तामिळनाडू या संघांचे प्रशिक्षक होते. ते काहीकाळ १९ वर्षाखालील संघाचेही प्रशिक्षक होते. तर २०१५ पासून ते राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. मात्र, आता ते हे पद सोडून भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करतील.

कर्स्टन यांना प्राधान्य  

गुरुवारी मुलाखतीसाठी रामन, रमेश पोवार आणि मनोज प्रभाकर हे स्वतः उपस्थित होते. तर गॅरी कर्स्टन यांच्यासह ५ जणांची स्काईपने मुलाखत झाली. प्रशिक्षकपदासाठी कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या समितीचे भारताला २०११ विश्वचषक जिंकवून देणारे कर्स्टन यांना प्राधान्य होते. मात्र ते आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे प्रशिक्षकपद सोडण्यास तयार नव्हते. त्यांच्याशी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरशी क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनीही चर्चा केली. पण या चर्चेतून तोडगा न निघाल्याने बीसीसीआयने रामन यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -