Eco friendly bappa Competition
घर क्रीडा Neeraj chopra : उद्योगपती आनंद महिंद्रांकडून नीरज चोप्राला Xuv700 गाडी गिफ्ट

Neeraj chopra : उद्योगपती आनंद महिंद्रांकडून नीरज चोप्राला Xuv700 गाडी गिफ्ट

Subscribe

सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक वचन दिले होते, त्या वचनाची पूर्तता करताना त्यांनी त्याला xuv700 कार बक्षीस म्हणून दिली आहे

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राचे देशभरातून आजही कौतुक होत आहे. त्याने टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक मिळवून एक नवा इतिहास घडवला आहे. त्याच्या कामगिरीच्या सन्मानार्थ देशभरातून अनेक ठिकाणांवरून नीरजवर कौतुकांसोबत बक्षीसांचाही वर्षाव होत आहे. त्याच्या सुवर्ण कामगिरीमुळे अनेक जाहिरात क्षेत्रात त्याचा वापर केला जात आहे, अशातच सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक वचन दिले होते, त्या वचनाची पूर्तता करताना त्यांनी त्याला कार बक्षीस म्हणून दिली आहे.

आनंद महिंद्रा यांनी नीरजला xuv700 बक्षीस देण्याची मागणी एका युजरने केली होती. त्यावर महिंद्रा यांनी आपल्या कंपनीतील २ अधिकाऱ्यांना टॅग करून Xuv700 गाडी गिफ्ट करण्याची सूचना दिली. अखेर आनंद महिंद्रा यांनी नीरजला दिलेल्या वचनाची पूर्तता केली. आणि नीरजला नवीन गाडी बक्षीस म्हणून पाठवली. एवढेच नाही तर त्या गाडीवर ८७.५८ असे देखील लिहले असून गाडीवर भाल्याची प्रतिकृती पहायला मिळत आहे.

- Advertisement -

नीरजने ८७.५८ मीटर सर्वाधिक भाला फेकून सुवर्णपदक जिंकले होते, त्यामुळे त्याच्यासाठी खास गाडी बनवली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्यावर नीरजवर देश-विदेशातून कौतुकांचा वर्षाव झाला होता. ८७.५८ मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. तब्बल १३ वर्षाच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर भारताच्या खात्यात सुवर्णपदक आले आहे. १३ वर्षापूर्वी बीजींग ऑलिम्पिकनंतरच हे पहिले सुवर्ण पदक आहे.

 

- Advertisement -
- Advertisement -
MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -