Ranji Trophy 2022: रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच दिवशी अंडर-१९ खेळाडूंची छाप, यश धूलचे शतक तर बावाची उत्कृष्ट गोलंदाजी

कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या रणजी करंडक स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली आहे. रणजी स्पर्धेचा पहिला सामना मुंबई आणि सौराष्ट्र अशा दोन संघामध्ये सुरू आहे. तसेच दुसरीकडे दिल्ली आणि तामिळनाडू या दोन संघामध्ये सामना सुरू आहे. रणजी करंडक देशांतर्गत क्रिकेटमधील एक महत्त्वाची स्पर्धा आहे. रणजीमधून देशाला अनेक प्रतिभावान क्रिकेटपटू मिळाले आहेत.

अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या संघाचा कर्णधार यश धूलने रणजी ट्रॉफीच्या माध्यमातून आपल्या करिअरला धमाकेदार सुरुवात केली आहे. तामिळनाडू विरूद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावलं आहे. १९ वर्षीय यशने अवघ्या ५७ बॉलमध्ये १०० धावा पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर डाव पुढे सुरु ठेवत १३३ चेंडूत शतक झळकावले. दिल्लीने ३ विकेट गमावले असले तरी यश मात्र एका बाजूला उत्तम खेळी करत होता. यशने चौथ्या विकेटसाठी जॉन्टी सिद्धूसोबत ११९ धावांची शतकी भागीदारी केली आहे.

बावाची उत्त्कृष्ट गोलंदाजी

अंडर-१९ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पाचवी विकेट घेण्यासाठी युवा ऑलराऊंडर राज बावाने उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच बॉलमध्ये विकेट घेण्यात यश मिळालं आहे. १९ वर्षीय बावाने पहिल्याच बॉलमध्ये तन्मय अग्रवालची विकेट घेतली. बावाने १७ बॉलमध्ये दोन गडी बाद केले आहेत. राज बावा आणि यश धुल हे दोन्ही खेळाडू अंडर-१९ वर्ल्डकपच्या खेळीसाठी बेस्ट प्लेअर्स राहीले आहेत.

राज बावा आणि यश धुल यांच्यासाठी अंडर-१९ विश्वचषक चांगला होता. यशने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले, तर बावाने साखळी सामन्यात फलंदाजीत १६२ धावांची नाबाद खेळी करत विजेतेपदाच्या सामन्यात पाच बळी घेतले. दोन्ही खेळाडूंना आयपीएलमध्येही चांगल्या रकमेत खरेदीदार मिळाले.


हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या घरी कार्यकर्ते पत्र धाडणार, नाना पटोलेंची माहिती