घरक्रीडाYashasvi Jaiswal : आयसीसी कसोटी क्रमवारीत 'यशस्वी'ची मोठी झेप

Yashasvi Jaiswal : आयसीसी कसोटी क्रमवारीत ‘यशस्वी’ची मोठी झेप

Subscribe

नवी दिल्ली : आयसीसीने आज कसोटी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने मोठी झेप घेत 15 वा क्रमांक पटकावला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत यशस्वी जैस्वालने चमकदार कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये द्विशतके झळकावली आहेत. या गोष्टीचा फायदा त्याला कसोटी क्रमवारीत झाला आहे. तर त्याचवेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासह इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटलाही क्रमवारीत फायदा झाला आहे. (Yashasvi Jaiswal Successful leaps forward in ICC Test rankings)

हेही वाचा – IND Vs ENG Test: भारत-इंग्लंड कसोटीवर खलिस्तानी अतिरेकी ‘पन्नू’ची नजर; सामना रद्द करण्याची धमकी

- Advertisement -

आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत सलग दुसरे द्विशतक झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वाने 14 गुणांची झेप घेत 15 व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या खात्यात आता 699 गुण आहेत. त्याने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत 545 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे तो आता कसोटी मालिकेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. जैस्वालशिवाय रोहित शर्मा 732 गुणांसह 12व्या स्थानावर पोहोचला आहे. तर सरफराज खान आणि ध्रुव जुरेल अनुक्रमे 75व्या आणि 100व्या स्थानावर पोहोचले आहेत.

जडेजा आणि अश्विनला क्रमवारीत फायदा

राजकोट कसोटीत रवींद्र जडेजाने अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याने पहिल्या डावात 112 धावांची खेळी केली होती. याचा फायदा त्याला आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत झाला आहे. तो आता 595 गुणांसह 34 व्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय सात विकेट्स घेऊन तो गोलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर अश्विन गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IND vs ENG 4th Test: KL राहुल आणि जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीतून बाहेर; तर मुकेश कुमारचे पुनरागमन

विराट कोहली टॉप 10 मध्ये कायम

आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत केन विल्यमसन अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचवेळी, भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचा भाग नसलेला भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली सुद्धा टॉप 10 मध्ये आहे. तो 752 रेटिंग गुणांसह सातव्या स्थानावर कायम आहे. तर सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारताविरुद्ध शतक झळकावणारा इंग्लंजचा फलंदाज बेन डकेट आयसीसी कसोटी क्रमवारीत 719 गुणांसह 13व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याला 12 स्थानांचा फायदा झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -