घरक्रीडाYashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावून रचला इतिहास; सचिननेही म्हटले "यशस्वी...

Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावून रचला इतिहास; सचिननेही म्हटले “यशस्वी भव:”

Subscribe

विशाखापट्टणम : येथील एसीए-व्हीडीसीए स्टेडियममध्ये भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने वयाच्या 22 व्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत शानदार फलंदाजी करत दमदार द्विशतक झळकावले. त्याने आपले द्विशतक अवघ्या 277 चेंडूत 209 धवांची खेळी केली. यासह यशस्वीने आपल्या द्विशतकासह अनेक विक्रमही मोडीत काढले आहेत. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही ट्वीट करताना त्याचे कौतुक केले आहे. (Yashasvi Jaiswal made history by marking a bicentennial Sachin also said Successful Bhava)

हेही वाचा – Supriya Sule : केंद्र सरकारने राज्य सरकार बरखास्त करावं, सुप्रिया सुळे यांची मागणी

- Advertisement -

यशस्वी जैस्वाल हा घरच्या मैदानावर कसोटीत द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण सलामीवीर फलंदाज ठरला आहे. त्याने 22 वर्षे 37 दिवसांत ही कामगिरी केली. यासह तो भारतासाठी कसोटीत द्विशतक झळकावणारा चौथा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. दरम्यान, भारतासाठी कसोटीत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विनोद कांबळीचे नाव आघाडीवर आहे. 1993 मध्ये त्याने 21 वर्षे 35 दिवसांत इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली होती. याशिवाय या यादीत सौरव गांगुली आणि गौतम गंभीर यांचीही नावे आहेत.

सर्वात कमी धावात 200 धावा करणारे भारतीय फलंदाज

करुण नायरने अवघ्या 3 डावात भारतासाठी 200 धावा केल्या आहेत. आता या यादीत यशस्वी जैस्वालचेही नाव जोडले गेले आहे. त्याने 10 डावात आपले पहिले द्विशतक झळकावले आहे. त्याच्याआधी चेतेश्वर पुजारा (9 डाव), सुनील गावस्कर (8 डाव), मयंक अग्रवाल (8 डाव) आणि विनोद कांबळी (4 डाव) यांनी 200 धावा केल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Bharatratna: उशीर केला पण, भारतरत्न घोषित झालेली दोन्ही नावं अतिशय योग्य; शरद पवारांची प्रतिक्रिया

सचिन-सेहवागच्या यादीत जैस्वाल सामील

आतापर्यंत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 24 खेळाडूंनी द्विशतके झळकावली आहेत. त्यात अनुभवी वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा या खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. आता जैस्वाल कसोटीत द्विशतक झळकावणारा भारताचा 25वा खेळाडू ठरला आहे.

सचिननेही केले कौतुक

यशस्वी जैस्वालने द्विशतक झळकावल्यानंतर सचिन तेंडुलकरने ट्वीट करत त्याचे कौतुक केले आहे. सचिनने यशस्वी जैस्वालचा शतकानंतर सेलिब्रेशन करतानाचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना सचिनने दोन शब्दात यशस्वी भव: असे लिहिले आहे. सचिनने केलेले ट्वीट चाहत्यांच्या पसंतीस पजताना दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -