घर क्रीडा जयस्वाल आणि गिलचा झंझावात; 9 विकेटने भारताचा विंडिजवर विजय, मालिकेत 2-2 ची...

जयस्वाल आणि गिलचा झंझावात; 9 विकेटने भारताचा विंडिजवर विजय, मालिकेत 2-2 ची बरोबरी

Subscribe

भारत विरुद्ध वेस्टइंडीड या दोन्ही संघांमध्ये 5 T- 20 सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा T- 20 सामना फ्लोरिडाच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघानं 9 गडी राखून विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघानं ही मालिका 2-2 च्या बरोबरीत आणली आहे.

भारत विरुद्ध वेस्टइंडीड या दोन्ही संघांमध्ये 5 T- 20 सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा T- 20 सामना फ्लोरिडाच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघानं 9 गडी राखून विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघानं ही मालिका 2-2 च्या बरोबरीत आणली आहे. आता पाचवा आणि शेवटचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. हा सामना जो जिंकेल त्याच्या खिशात ही मालिका जाणार आहे. ( Yashswi Jaiswal and Shubhaman Gill Fantastic Batting India beat West Indies by 9 wickets level the series 2 2 )

भारताचा डाव

वेस्ट इंडिजनं 20 षटकांच्या खेळात 8 गडी गमावून 178 धावा केल्या आणि विजयासाठी 179 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताच्या सलामीच्या जोडीनं अगदी सोपं करून टाकलं. भारताकडून शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानात उतरली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी दीड शतकी भागीदारी केली. शुभगम गील हा 77 धावा करून तंबूत परतला.

गिल- जयस्वालच्या जोडीची तुफान बॅटिंग

- Advertisement -

शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांनी भारतीय संघाला आक्रमक सुरूवात करून दिली. दोघांनीही चौफेर फटकेबाजी करत धावसंख्या वाढवण्यावर भर दिला . गिल आणि जयस्वाल या जोडीनं विडिंजची गोलंदाजी फोडून काढली. या युवा जोडीपुढे विडिंजचे गोलंदाज कमकुवत वाटत होतं. गिल-जयस्वाल या जोडीने विक्रमी दीडशतकी भागिदारी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. अखरेच्या काही षटकांत गिल बाद झाला. परंतु तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने झुकला होता. गिल आणि जयस्वाल यांनी 94 चेंडूत 165 धावांची भागिदारी केली. यामध्ये यशस्वी जयस्वाल यानं 47 चेंडूत 79 धावांचं योगदान दिलं तर शुभमन गिल यानं 47 चेंडूत 77 धावा जोडल्या. गिल आणि जयस्वालनं पहिल्या सहा षटकात 66 धावा केल्या होत्या. या जोडीनं 10 षटकात शतकी भागिदारी केली. यशस्वी आणि गिल या जोडीनं भारतासाठी T-20 मधील सर्वोच्च भागिदारीची नोंद कोली. याआधी हा विक्रम रोहित आणि राहुल यांच्या नावावर होता.

विंडिजचा डाव

पाटा पिचवर वेस्ट इंडिज संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. शाय होप्स आणि शिम्रॉन हेटमायर वगळता एकही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. खरं तर नाणेफेकीचा कौल विंडिजच्या बाजूने लागला होता. त्यामुळे 200 पार धावा होतील असा अंदाज होता. परंतु त्यांना भारतीय गोलंदाजांनी रोखलं. शिम्रॉन हेटमायर 39 चेंडूत 61 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने3, कुलदीप यादवने 2, तर अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

- Advertisement -

( हेही वाचा: भारतीय हॉकी संघाची अंतिम सामन्यात धडक; उपांत्य फेरीत जपानचा 5-0ने पराभव )

- Advertisment -