Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा ठाण्याची मनाली जाधव गाजवतेय देशाचे मैदान

ठाण्याची मनाली जाधव गाजवतेय देशाचे मैदान

महाराष्ट्राला सलग तीन वर्षे सुवर्णपदक मिळवून देणारी मनाली ही ठाणे जिल्ह्यातील पहिली महिला कुस्तीपटू आहे.

Related Story

- Advertisement -

कुस्ती या महाराष्ट्राच्या मातीत मुरलेल्या खेळात मनाली चंद्रकांत जाधव ही ठाण्याची युवा खेळाडू आपल्या जिद्दीच्या जोरावर ऑलिम्पिकचे स्वप्न बघत आहे. भिवंडीतील एका लहान गावातून जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा गाजवत मनालीने खेळाची सुरुवात केली. परंतु, पुढे तिने वैयक्तिक खेळ निवडला. आईकडून मूलभूत कुस्तीचे धडे गिरवून ठाणे जिल्ह्याच्या स्पर्धा गाजवत मनालीने प्रशिक्षक वस्ताद विजय बराटे, संदीप पठारे, माधुरी धरळ यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्यास सुरुवात केली.

उल्हासनगर येथील एस.एस.टी महाविद्यालयाच्या कला शाखेतून मनालीने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि सध्या ती एम.ए. प्रथम वर्षात शिकत आहे. तिने मुंबई विद्यापीठात सलग चार वर्षे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्तरावर तिने सलग चार वेळा मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. २०१९-२० मध्ये हरयाणा येथे झालेल्या स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणारी मुंबई विद्यापीठाची ती पहिली महिला कुस्तीपटू ठरली. तसेच महाराष्ट्राला सलग तीन वर्षे सुवर्णपदक मिळवून देणारी मनाली ही ठाणे जिल्ह्यातील पहिली महिला कुस्तीपटू आहे.

- Advertisement -

मुंबई महापौर, खाशाबा जाधव चषक, महाराष्ट्र कुस्ती दंगल यांसारख्या अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पदक पटकावून तिने ठाणे जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. राज्यस्तर गाजवत असतानाच तिने हरयाणा, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यातील महिला मल्लांना अस्मान दाखवत राष्ट्रीय स्पर्धाही गाजवल्या आहेत. तिची लहान बहिण गौरी ही सुद्धा कुस्तीमध्ये आपले नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावत आहे.

- Advertisement -