Youth Olympic Games 2018: नेमबाज मेहुली घोषला कांस्यपदक

भारताची नेमबाज मेहुली घोषने युथ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.

मेहुली घोष (सौ-Scroll)

भारताची नेमबाज मेहुली घोषने युथ ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीचा १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली आहे. सुरूवातीपासून खूप चांगला खेळ दाखवणाऱ्या मेहुलीने २४८.० गुणांसह रौप्यपदक पटकावले. तर डेन्मार्कच्या स्टेफनी गृण्डसो हिने २४८.८ गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली.


हे भारताचे नेमबाजीतील दुसरे पदक ठरले आहे. याआधी शाहू माने याने पुरुषांच्या एअर रायफल प्रकारात रौप्यपदक मिळवले होते. मेहुलीने या स्पर्धेच्या पात्रता फेरीत अप्रतिम प्रदर्शन केले. ६२८.८ गुण मिळवत ती पात्रता फेरीत अव्वल स्थानी राहिली होती.