घरक्रीडाYouth Olympic Games 2018 : सौरभ चौधरीचा सुवर्णवेध

Youth Olympic Games 2018 : सौरभ चौधरीचा सुवर्णवेध

Subscribe

युथ ऑलिम्पिकमध्ये भारताचा नेमबाज सौरभ चौधरीने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

ब्यूनोस एयर्स येथे सुरू असलेल्या युथ ऑलिम्पिकमध्ये भारताचा नेमबाज सौरभ चौधरीने १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. या युथ ऑलिम्पिकमधील हे भारताचे तिसरे सुवर्णपदक ठरले आहे. याआधी नेमबाज मनू भाकर आणि वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगाने सुवर्णपदक जिंकले होते.

२४४.२ गुणांसह सुवर्णपदक

सौरभ चौधरीने या स्पर्धेच्या पात्रता फेरीत ५८० गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते. तर अंतिम फेरीत सौरभने २४४.२ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. तर द.कोरियाच्या सुंग युन्होने २३६.७ गुणांसह रौप्यपदक आणि स्विर्त्झलँडच्या सोलारी जेसनने २१५.६ गुणांसह कांस्यपदक मिळवले. सौरभने अंतिम फेरीत १८ वेळा १० किंवा त्यापेक्षा जास्त गुणांवर नेम मारला. त्यामुळे मोठ्या फरकाने त्याने ही स्पर्धा जिंकली.

- Advertisement -

नेमबाजीत ४ पदके

सौरभ चौधरीने जिंकलेले हे भारताच्या नेमबाजांनी जिंकलेले चौथे पदक आहे. सौरभ, मनूसोबतच तुषार माने आणि मेहूली घोष या दोन नेमबाजांनी या स्पर्धेत रौप्यपदके जिंकली आहेत. मेहूलीचे सुवर्णपदक अवघ्या ०.८ गुणांनी हुकले होते. मनू, तुषार आणि मेहूल हे तिघेही सौरभला अंतिम फेरीत प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -