‘तुझ्या दुधीचा…’; चहलच्या ‘त्या’ फोटोवर युवराज सिंहची हटके कमेंट

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असतो. विविध पोस्ट शेअर करत युवराज चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या मजेशीर कमेंट्समुळे (Comments) तो खूप चर्चेत असतो.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय असतो. विविध पोस्ट शेअर करत युवराज चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या मजेशीर कमेंट्समुळे (Comments) तो खूप चर्चेत असतो. नुकतेच युवराजने फिरकीरटू युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) या पोस्टवर कमेंट केली आहे. युवराजची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिवाय, युवराजच्या या एका कमेंटचने चाहत्यांनी अनेक अर्थ लावत कमेंट्स केल्या आहेत.

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल याने त्याच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत युजवेंद्र चहल याने दुधी हातात पकडून फलंदाजीची अॅक्शन करणारा फोटो शेअर केला आहे. सोबत ‘माझ्या दुधीचा शॉट स्टेडियमच्या पलीकडे गेला असावा, अशी मी पैज लावतो. जितेंद्र तुम्ही सहमत आहात का?’ असे कॅप्शन दिले आहे. चहलच्या या फोटोवर युवराज सिंह याने हास्यास्पद कमेंट केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23)

हेही वाचा – 6,6,6,6,6,6,… ‘या’ खेळाडूने एकाच षटकात ठोकले सहा षटकार; व्हिडीओ पाहून होईल युवराज सिंहची आठवण

चहलने नुकतीच वेबसीरिज पंचायत-2 (Panchayat-2) संदर्भात एक पोस्ट केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की दुधी देखील पंचायत-2 वेब सीरिजमधील एका पात्राप्रमाणे आहे. या मालिकेत सरपंच प्रत्येक वेळी अभिनेता जितेंद्र म्हणजेच सचिव जी यांना दुदी भेट देतात. याच खवय्याबद्दल चहलने ही पोस्ट केली आहे. पण हा फोटो शेअर केल्याने चहलला ट्रोल करत युवराजने लिहिले की, ‘तुझ्या दुदीचा आकारही तुझ्यासारखाच आहे’. युवराजची ही कमेंट चांगलीच व्हायरल होत आहे.

युझवेंद्र चहल आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला. चहल या मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता. या मोसमात त्याने एकूण २७ विकेट घेतल्या. याआधीही आयपीएलच्या इतिहासात स्पिनरने एका मोसमात इतक्या विकेट्स घेतल्या नव्हत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत चहलही संघाचा एक भाग आहे.


हेही वाचा – ‘त्याला’ कानशिलात लगावल्याचा मला आजही होतोय पश्चाताप; हरभजनकडून चुकीची कबुली