घरक्रीडायुवराज सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

युवराज सिंगची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू युवराज सिंगने आज पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेत त्याने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. यावेळी युवराज सिंग भावूक झाला होता.

पत्रकार परिषदेत युवराज सिंगने आपली निवृत्ती जाहीर केली आहे. पत्रकारपरिषदेत त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक खेळाडू युवराज सिंगने दुपारी एक वाजता पत्रकार परिषद बोलावली. गेल्या कित्येक दिवसांपासून युवराज सिंग आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दिला पूर्णविराम देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु होती. आज अखेर त्याने निवृत्तीची घोषणा केली. त्याने दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद बोलावली होती. या परिषदेत त्याने सर्वांचे आभार मानले.

युवराज झाला भावूक

युवराज सिंग हा आक्रमक आणि नाविण्यपूर्ण असा खेळाडू. त्याने सहा बॉलवर मारलेले सहा सिक्स भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या कधीही विस्मरणात जाणार नाहीत. आज १८ वर्षाच्या कारकिर्दीनंतर युवराजने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची निवृत्ती जाहीर केली. निवृत्ती जाहीर करताना युवराज सिंग भावूक झाला होता. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला त्याने सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले. यावेळी युवराजने आपल्या आई-वडिलांचे देखील आभार मानले. पत्रकार परिषदेत बोलताना युवराज भावूक झाला होता. त्याने केलेले पराक्रम आणि कर्करोगाशी दिलेली झुंज सर्व क्रिकेट चाहत्यांना ज्ञात आहे. यावेळी आपल्याला ४०० सामने खेळायला मिळाल्याचा अभिमान असल्याचे युवराज म्हणाला.

- Advertisement -

युवराजचे हृदयस्पर्शी भाषण

‘क्रिकेटने मला आयुष्यात खुप काही दिले. कधी हार मानायची नाही, ही शिकवण मला क्रिकेटनेच दिली. त्यामुळेच मी कर्करोगाशी लढून पुन्हा मैदानात उतरलो. मी कधीही हार मानली नाही. २०११ साली विश्वचषक जिंकून मी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. अर्थात या सर्व घडामोडीत आईची भूमिका फार महत्त्वाची ठरली. त्यामुळे आईचा अत्यंच ऋणी राहील’, असे युवराज सिंह म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -